Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसमध्ये छुप्या बैठकांचे सत्र पक्ष नेतृत्त्वासमोरील टेन्शन वाढले, पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड

हरयाणा आणि जम्मू-काश्मीरचे निकाल समोर आलेत आणि पुन्हा एकदा भाजपने हरयाणामध्ये बाजी मारली आहे. आता यानंतर महाराष्ट्रामध्ये काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यानंतर आता काँग्रेसमध्ये छुप्या बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे समोर आलंय. यामुळे पक्ष नेतृत्वासमोरील टेन्शन वाढलं आहे. तर पक्षातील अंतर्गत गटबाजीदेखील पुन्हा उघड झाली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 09, 2024 | 10:03 AM
निकालानंतर काँग्रेसच्या छुप्या बैठका वाढल्या

निकालानंतर काँग्रेसच्या छुप्या बैठका वाढल्या

Follow Us
Close
Follow Us:

महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. अनेक जागांवर अद्याप एकमत झालेले नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप कायम आहे. जागावाटपाचे सूत्र कायम झालेले नसतानाच महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी छुप्या बैठकांचा सिलसिला सुरु केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री पदाबरोबर मंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील सर्वच बडे नेते या बैठकींमध्ये सध्या व्यस्त असल्याचे माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. याशिवाय या बैठकींमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संवाद साधून त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींकडून सुरु असल्याचेही कबुली अनेक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

काँग्रेसची उमेदवारांची चाचपणी 

महाविकास आघाडीला मुख्यत: काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण असून विधानसभेत जास्तीत जास्त पक्षाने लढव्यावात यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी जागावाटपाच्या चर्चेतही काँग्रेस जास्तीत जास्त जागांसाठी दावा करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांची चाचपणी पूर्ण करीत एक यादी जवळपास निश्चित केली आहे. लवकरच या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतला जाणार असून त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मानस बोलून दाखविला आहे.

हेदेखील वाचा – मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी? हरयाणातील निकालाचे महाराष्ट्रावर पडसाद?

बैठकांचा जोर

तर दुसरीकडे या इच्छुक उमेदवारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षांतंर्गत बैठकांचा जोर वाढल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या समर्थकांच्या बैठकांचे आयोजन करीत निवडणुक कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच अनेक प्रथम फळीतील नेते मंडळींकडून इच्छुक उमेदवारांची वैयक्तिक भेट सुद्धा घेतली जात आहे. 

समित्यांची ऑफर

या भेटीत निवडणुकीसाठी तयारीला लागण्याची सूचना देतानाच निवडणुकीनंतरच्या रणनितीवरही चर्चा केली जात असल्याची माहिती काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने खासगीरित्या बोलताना दिली. या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री पदाबाबतही चर्चा करण्यात आल्याची कबुलीही यावेळी अनेकांकडून देण्यात आली आहे. याशिवाय अनेक नेते मंडळींकडून इच्छुकांना मंत्री पदासोबतच इतर महामंडळ किंवा समित्यांची ऑफर देत असल्याची माहिती यावेळी पुढे आली आहे. पक्षातील या छुप्या बैठकींची माहिती सध्या दिल्ली दरबारीही पोहचली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पक्षातील या अंतर्गत गटबाजीचे आव्हान आता महाराष्ट्र काँग्रेसमोर असणार आहे.

हेदेखील वाचा – ‘मी साहेबांना सांगूनच वेगळी राजकीय भूमिका घेतली’; अजित पवारांचा मोठा दावा

Web Title: Sessions of hidden meetings in congress tensions over party leadership increased intra party factionalism exposed again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 10:03 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.