Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेट घशात अडकल्याने सात महिन्यांची मुलगी दगावली; ‘ते’ चॉकलेट उचलणं बेतलं जीवावर…

बीड तालुक्यातील काटवटवाडी गावातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2025 | 09:30 AM
चॉकलेट गिळल्यामुळे सात महिन्यांची मुलगी दगावली

चॉकलेट गिळल्यामुळे सात महिन्यांची मुलगी दगावली

Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली. एका ७ महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकले आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बीड तालुक्यातील काटवटवाडी गावातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव असून, ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. अचानक चॉकलेट घशात अडकल्याने तिला श्वास घेणेही कठीण झाले. काही क्षणातच तिची प्रकृती गंभीर बनली. कुटुंबीयांनी घाईघाईने तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत तिच्यावर कोणतेही उपाय होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जवळील इमामपूर रोड परिसरात या तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

दहा वर्षांच्या बाळाचा मृत्यू

दुसऱ्या एका घनटेत, काही महिन्यांपूर्वीच, शेजारच्या बाळासोबत खेळायला गेलेल्या एका दहा वर्षीय बालकाचा पाळण्याच्या दोरीचा गळफास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. नमन नितीन निंभोरकर (वय 10, रा. चिचफैल लाईन नं. 2. रुख्मिमीनगराजवळ) असे मृत बालकाचे नाव आहे. दोरीच्या पाळण्याने गळफास लागल्याची ही घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Seven month old girl dies after chocolate gets stuck in throat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Beed News

संबंधित बातम्या

Pankaja Munde helicopter : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच…
1

Pankaja Munde helicopter : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.