Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pankaja Munde helicopter : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच…

Pankaja Munde helicopter : मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 03, 2026 | 11:52 AM
Minister Pankaja Munde helicopter technical fault in sambhaji nagar political news

Minister Pankaja Munde helicopter technical fault in sambhaji nagar political news

Follow Us
Follow Us:
  • पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
  • मंत्री पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द
  • मंत्री पंकजा मुंडे या सुरक्षित
Pankaja Munde helicopter : बीड : भाजपच्या बड्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. बारामती अपघात प्रकरण ताजे असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये देखील बिघाड झाल्याचे समोर आले. यामुळे राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. यामुळे त्या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचारसभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने आकाशात झेपावणार इतक्यात त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.

हे देखील वाचा : दादांच्या अपघातामागे संशयाचा धूर; लिंबू-मिरची उताराः ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच

उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नियोजित कार्यक्रमांना विलंब झाला असला, तरी पंकजा मुंडे सर्व सभांना हजेरी लावणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पंकजा मुंडे सुरक्षित असल्याचे समजताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

हे देखील वाचा :  ‘मी तुम्हाला मिठीत घेऊन…’; जय पवारांची वडिल अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

अजित पवार यांचे अपघाती निधन

अवघ्या काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामुळे राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला. दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.  गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Minister pankaja munde helicopter technical fault in sambhaji nagar political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Beed News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Pankaja Munde
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
3

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.