Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर दंगलीवरून आता श्रीमंत शाहू छत्रपती मैदानात, नागरिकांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याचे केले आवाहन

  • By युवराज भगत
Updated On: Jun 08, 2023 | 09:20 PM
कोल्हापूर दंगलीवरून आता श्रीमंत शाहू छत्रपती मैदानात, नागरिकांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याचे केले आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर दंगलीवरून (Kolhapur Riots) आता शाहू राजे छत्रपती हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची आता गरज असल्याचे म्हटले आहे. सामाजिक सलोखा ही कोल्हापूरची परंपरा आहे. आज 75 वर्षे आपल्याला लोकशाहीला झाले आहेत. आता नवीन युगात राहतो, 21 व्या शतकात राहतोय, त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम चुकीचे आहे. आशा वेळेस आपल्या पूर्वजांच्या विचार आणि त्यांची शिकवणी आपल्या डोळ्यांसमोर असणे गरजेचे आहे. असे यापूर्वी कधी झाले नव्हते

कोल्हापूरला अशा प्रकारची दंगल होणे शोभत नाही

त्यानंतर पुरोगामी विचाराच्या कोल्हापूरला अशा प्रकारची दंगल होणे, हे या शहराला शोभत नाही. या सर्व गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे, त्याचे कारण काय हे शोधणं गरजेचे आहे. या प्रकरणाकडे सायक्लोजी पद्धतीने पाहिले पाहिजे. सर्वांनी सामाजिक सलोख्याने राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात पहिले सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शासनाची आणि गृहखात्याची असते. त्यांनी या संबंधित सर्व रिपोर्ट घेतले पाहिजे आणि अशा घटना परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. संभाजीनगर, नाशिक आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची लिंक आहे, की सर्व वेगवेगळ्या आहेत का याकडे पाहिले पाहिजे. पोलिसांनी आता यापुढे सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येकाने शांतता कायम राहील यासाठी प्रत्येकाने तसे वागले पाहिजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये सुराज्य आणायचे असेल तर तसे सर्वांनी एक दिलाने राहिले पाहिजे, असेसुद्धा त्यांनी सांगितले.

या कारणाने पेटली दंगल

कोल्हापूरमध्ये शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथंच वादाची ठिणगी पडली. त्यामुळे कोल्हापूरचे वातावरण चिघळले, लोकं रस्त्यावर उतरली होती. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडे (Police) मागितली होती. परंतु, काही समाज कंटकांनी त्या आंदोलनाला गालबोट लावत दगडफेक करीत, वातावरण चिघळवले. परंतु पोलिसांनी कडक कारवाई करीत दंगल पांगवली आहे. या दंगलीचे पडसाद सर्वंत्र उमटत आहेत. तसेच आज कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्यात आली आहे. मात्र या दंगलीनंतर अनेक संतप्त प्रतिक्रिया सर्व क्षेत्रातून येत असताना, आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

कोल्हापूरमधील राड्याप्रकरणी 36 जणांना अटक

दरम्यान, कोल्हापूरमधील राड्याप्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर असल्याचं सांगितेले. कालच्या राड्याप्रकरणी 36 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे पोलील अधीक्षकांनी आवाहन केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त करण्यात आला होता. आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. शहराती दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासणार. सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई करणार. सोशल मीडियावर स्टेटस ठेवणारे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. एका मुलाचं स्टेटस इतरांनी कॉपी करुन ठेवलं, त्यामुळं वाद वाढला.

Web Title: Shahu maharaj chhatrapati peace for appeal to citizens need to follow thought of rajarshi chhatrapati shahu maharaj nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2023 | 08:39 PM

Topics:  

  • Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj

संबंधित बातम्या

लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराजांनी घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 06 मे चा इतिहास
1

लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराजांनी घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 06 मे चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.