Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashta Politics : राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असून त्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोसदौऱ्यावर शरद पवार गटाने हल्लाबोल केला.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 22, 2025 | 10:34 PM
राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला

राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असून त्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोसदौऱ्यावर शरद पवार गटाने हल्लाबोल केला. ‘दावोसमध्ये होत असलेल्या कंपन्याची नावे पाहता, अधिकतम भारतीय कंपन्या आहेत. मग या कंपन्यासोबत करार करण्यासाठी दावोसला जाण्याची खरंच गरज होती का? असा सवाल शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. ‘महाराष्ट्रात राज्य सरकार आहे की, नाराज सरकार आहे? असाही सवाल करत कोल्हे यांनी टीका केली.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोका कोला कंपनीच्या सीएसआर निधीतून बसविण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोल्हे प्रसारमाध्यमांशी बोलले.

‘राज्यात राज्य सरकार आहे की, नाराज सरकार आहे? असा खिल्ली उडवणारा प्रश्न कोल्हे यांनी विचारला आहे. गेली दोन महिने मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाचे वाटप या नाराजीनाट्यातच सरकार गुरफटलं आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. असंवैधानिक पदासाठी हे चढाओढ का करत आहेत? केवळ जिल्ह्यातील निधी वाटपाचे हक्क मिळावे, यासाठी हे सगळं चाललं की विकासासाठी चाललंय? असे अनेक प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केले आहेत.

‘विमानतळाप्रमाणे हातातोंडाशी आलेला पुणे-नाशिक रेल्वेला घास हरवायचा आहे? की तीस देशांच्या संशोधनासाठी जुन्नरमध्ये होणाऱ्या जीएमआरटी प्रकल्पाचं ओझं वाहायचं आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केलाय. जीएमआरटी हवं असेल तर पुणे-नाशिक रेल्वे रद्द होणार नाही, असा तोडगा सरकारने काढावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

दावोसमध्ये 15.70 लाख कोटींचे सामंजस्य करार

दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने इतिहास घडवला आहे. महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Sharad pawar group mp amol kolhe reaction on mahayuti government on guardian minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 10:34 PM

Topics:  

  • Sharad Pawar Group

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?
1

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
2

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.