Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“असे पहिल्यांदाच घडले! बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांचे नाव डावलले”; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या भावना

  • By युवराज भगत
Updated On: Feb 29, 2024 | 08:35 PM
Sharad Pawar was dropped for the first time for a government program in Baramati; Supriya Sule said…

Sharad Pawar was dropped for the first time for a government program in Baramati; Supriya Sule said…

Follow Us
Close
Follow Us:
Namo Maharojgar Melava : ‘नमो महारोजगार मेळावा’निमित्त बारामतीमध्ये शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना निमंत्रण पण पक्षाचे अध्यक्ष आणि बारामतीचे नेते शरद पवार यांना निमंत्रणच नाही. बारामतीच्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’वरून पवार विरुद्ध पवार संघर्ष उघड झाला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण नाही
बारामतीमध्ये सरकारतर्फे ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. २ आणि ३ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण मिळाले नसल्याची बातमी आज दिवसभर सुरू होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पुणे कार्यालयात सदर निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली. मात्र, शरद पवार यांना अद्यापही निमंत्रण दिलेले नाही.
निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर
सुप्रिया सुळे यांनी निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यामध्ये त्यांचे नावही समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचे दिसले. शरद पवार आणि बारामती असे समीकरणच आजवर दिसत होते. देशाचे अनेक माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान हे बारामती येथे येऊन गेले आहेत. कोणताही शासकीय कार्यक्रम असला तरी शरद पवार त्याचा भाग असतात. मात्र, पहिल्यांदाच त्यांना एखाद्या शासकीय कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे.
शरद पवार ज्या विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्याच संस्थेच्या मैदानात सदर मेळावा संपन्न होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही शरद पवार यांना निमंत्रण दिलेले नाही, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी विधान भवनात माध्यमांशी बोलताना दिली. तर निमंत्रण मिळण्यापूर्वी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, “मला निमंत्रण मिळाले नाही तरी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला उपस्थित राहणार.”
खासदार वंदना चव्हाण यांना निमंत्रण, पण पवारांना वगळलं
विशेष म्हणजे निमंत्रण पत्रिकेवर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. पण बारामतीचे असलेले आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचा नामोल्लेख टाळला गेला आहे. “२०१५ च्या शासन निर्णयानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांसाठी स्थानिक आमदार, खासदार (दोन्ही सभागृह) यांना निमंत्रित केले जावे, असा नियम करण्यात आला आहे. तरीही या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच राजशिष्टाचाराचा कोणताही नियम या कार्यक्रमासाठी पाळला गेला नाही”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शरद पवारांच्या संस्थेत कार्यक्रम याचा आनंद
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, शरद पवार यांनी स्थापन केलेल्या आणि आजही तेच अध्यक्ष असेलल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेत हा कार्यक्रम होत आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. पण शरद पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण का दिले नाही? याचे उत्तर सरकारच देऊ शकते.
शरद पवार प्रेक्षकांमध्ये बसणार?
आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माध्यमांशी बोलत असताना सांगितले की, शरद पवारांना निमंत्रण मिळाले नसले तरी ते बारामतीकर म्हणून प्रेक्षकांमध्ये बसून हा कार्यक्रम पाहण्यासाठी तयार आहेत. तसेच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना गोविंदबागेतील घरी जेवणाचे निमंत्रणही दिले आहे. तसेच माझ्या संस्थेत येत आहात तर गेस्ट हाऊसवर चहासाठी या, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यांची ही कृती शिष्टाचार नाकारणाऱ्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

Web Title: Sharad pawar name was dropped for first time for a government program at baramati so sentiments expressed by supriya sule nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 08:33 PM

Topics:  

  • Namo Maharojgar Melava

संबंधित बातम्या

Rojgar Mela 2026: रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पीएम मोदींनी दिला ‘देशसेवेचा’ कानमंत्र!
1

Rojgar Mela 2026: रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पीएम मोदींनी दिला ‘देशसेवेचा’ कानमंत्र!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.