मुंबई : मी अनेक शपथविधी (Swearing In) सोहळ्यात सहभागी झालो. मात्र, मला आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांनी पेढा (Sweet) भरवला नाही किंवा पुष्पगुच्छ दिले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना (Governor Bhagat Singh Koshyari) टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांना शपथविधी सोहळ्यादरम्यान पेढा भरवतानाचा राज्यपालांचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडिओवरुन शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा टीव्हीवर पाहिला. त्यावेळी दोघांनी पेढा भरवून पुष्पगुच्छ दिला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे नेते जेव्हा शपथ घेत होते, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर आणि इतरांना स्मरण करुन शपथेला सुरुवात केली तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या उल्लेख केल्याने नाराजी
राज्यपालांनी मलाही नियमांनुसारच मला शपथ घेण्यास सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचा उल्लेख केला. परंतु, त्यावेळी आक्षेप घेतला नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.