Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रकाश आवाडे हेच लाचार; शशांक बावचकरांनी आवाडेंचा इतिहासच काढला

आमदार आवाडे यांच्या एकूणच भूमिकेबाबत पाहिले तर सद्या त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश करूनही स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील एकही नेता त्यांना किंमत देत नाही त्यामुळे सैरभैर होऊन त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 30, 2024 | 04:25 PM
प्रकाश आवाडे हेच लाचार; शशांक बावचकरांनी आवाडेंचा इतिहासच काढला
Follow Us
Close
Follow Us:
इचलकरंजी :  नुकतेच भाजपा मध्ये प्रवेश केलेले  आमदार प्रकाश आवाडे यांचे आजपर्यंतचा राजकीय प्रवास आणि आर्थिक सत्ताकेंद्र हे  केवळ आणि केवळ राष्ट्रीय काँग्रेसच्या कृपेनेच उभे राहीले आहे, हे वास्तव आहे. गेल्या ५  वर्षापासून भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन पुढार्‍यांची दारे पुजून कोणी लाचारी केली ? हे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. असे असताना आमदार आवाडे काँग्रेसला लाचार म्हणून टिका करत आहेत. वास्तविक काँग्रेसला लाचार म्हणणारे आमदार आवाडे हेच खरे लाचार आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.
बावचकर म्हणाले,  1995 पासून 2024 पर्यंत आमदार आवाडे यांनी7  वेळा काँग्रेसच्या हात या  चिन्हावर निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांना 370  कलम किंवा 35  ए का आठवले नाही ? वस्तुतः स्वतःचे पाप झाकण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असुन त्याला राष्ट्रीय प्रश्‍नांची जोड देऊन आपण कसे राष्ट्रीय विचारांचे, हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा त्यांचा केवीलवाणा प्रयत्न सुरु आहे.
हेही वाचा : नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यास पंतप्रधान पदाची संधी मिळणार का? नितीन गडकरी स्पष्टच बोलले
आमदार आवाडे जम्मु काश्मीरमधील लाल चौकात फडकलेल्या तिरंग्याबद्दल बोलतात पण नागपुरच्या रेशीम बागेतील मातृसंस्थेवर स्वातंत्र्यानंतर 53 वर्षेे तिरंगा फडकत नव्हता, त्याबद्दल बोलायचे धाडस दाखऊ शकतात का? असा सवालही बावचकर यांनी उपस्थित केला आहे. केवळ स्वतःच्या सोयीचे व स्वार्थाचे असेल तेवढेच बोलायचे हा आमदार आवाडे यांचा उद्योगच आहे. गेल्या ५ वर्षात भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन भाजप पुढार्‍यांची दारे पुजून कोण लाचारी केली ? हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यामुळे काँग्रेसला लाचार म्हणणारे आमदार आवाडे यांनी काँग्रेसवर आरोप करताना आपला पूर्व इतिहास आठवला तरी बरे झाले असते .
आमदार आवाडे यांच्या एकूणच भूमिकेबाबत पाहिले तर सद्या त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश करूनही स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील एकही नेता त्यांना किंमत देत नाही त्यामुळे सैरभैर होऊन त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे मात्र पक्षात त्यांना कोणते स्थान आहे हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही .काँग्रेसवर टीका करून भाजपामध्ये आपण किती एकनिष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे असे एकंदरीत दिसून येते.
हेही वाचा : गोमातेला मिळाला ‘राज्यमातेचा दर्जा’; महायुती सरकारचा सर्वांत मोठा निर्णय, हिंदू संघटनांकडून

Web Title: Shashank bawchkars response to prakash awades criticism nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • Ichalkaranji Politics

संबंधित बातम्या

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
1

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

CM Devendra Fadnavis: “… त्यातून पूराची समस्या दूर होण्यास मदत होईल”; मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान
2

CM Devendra Fadnavis: “… त्यातून पूराची समस्या दूर होण्यास मदत होईल”; मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.