Photo Credit- Social Media ( नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यास नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची संधी मिळणार )
मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात विरोधी पक्षांकडून आलेली पंतप्रधानपदाची ऑफर आल्याचे सांगितले होते. पण आपण ती ऑफर नाकारल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीनंतर नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाची खुर्ची मिळू शकते, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते. अशातच एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाबाबत विचारे असता, त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
मुंबईत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, जर पंतप्रधान मोदींनी वयाची ७५ वर्षे ओलांडल्यानंतर पंतप्रधानपद सोडले तर आरएसएस तुम्हाला पंतप्रधान बनवू शकते का, असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. यावर बोलताना गडकरी म्हणाले, “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. कोणत्याही अडचणीत पडण्याचीही माझी इच्छा नाही. मी माझे काम शांतपणे करतो. दुसरे म्हणजे, तुम्ही मला हे प्रश्न का विचारता? तुम्ही आरएसएसला हे प्रश्न का विचारत नाही, या प्रश्नाचे उत्तर आरएसएसच चांगल्या पद्धतीने देऊ शकते. असेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा: मोठी बातमी! माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात; पिकअपने जोरदार धडक दिली अन्…
त्यानंतर नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांच्या सहभागाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत तुम्हाला प्राधान्य दिले जात नाही का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, ” कारण पूर्वीपासूनच आपण पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच. मी “मी जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाच्या बैठका घेत होतो. मी हरियाणामध्येही पक्षाच्या बैठकांमध्ये व्यस्त होतो. मी जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी 4 बैठका घेत असल्याने, त्यावेळी मी नागपुरात उपस्थित नव्हतो. पण तरीही अशा अफवा पसरवल्या जात आहेत. असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये अनुदान जमा; सोयाबीन, कापूस उत्पादकांना