औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शिरीष बोराळकर यांची भारतीय बॅडमिंटन महासंघाच्यामार्केटिंग व पब्लिसिटी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाने २०२२ ते २०२६ या कालावधीसाठी विविधसमित्यांची स्थापना केली आहे. त्यात मार्केटिंग व पब्लिसिटी या समितीवर सदस्य म्हणूनऔरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांची निवड करण्यात आली.या समितीचे अध्यक्ष महासंघाचे कोषाध्यक्ष अरुण लखानी हे आहेत.
या समितीत उदित दत्ता,संदीप हेबळे, गौतम महांता, पुल्लेला गोपीचंद, नवरोझ मुनवर यांचा समावेश आहे. संजय मिश्राहे या समितीचे समवन्वयक आहेत.शिरीष बोराळकर हे एकेकाळचे उत्तम बॅडमिंटनपटू व क्रिकेटपटूराहिले आहेत. एक उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे. औरंगाबाद जिल्हाक्रिकेट संघटनेचे ते सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. एकेकाळी त्यांनी महिला क्रिकेटलाचालना दिलेली आहे. विविध खेळांना ते चालना देण्याचा प्रयत्न करीत असतात. भारतीय बॅडमिंटनमहासंघाच्या मार्केटिंग व पब्लिसिटी समितीवर सदस्य म्हणुन शिरीष बोराळकर यांची पहिल्यांदाचनिवड झाली आहे. ही निवड ते सार्थ ठरवतील अशी खात्री औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रातूनव्यक्त होत आहे.