Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद नाकारलं, आमदाराने थेट राजीनामाच दिला; शिंदेंच्या शिवसनेनेला मोठा धक्का

शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस पाळलं नाही, त्यामुळे तीनदा आमदारकी भुषवणाऱ्या नरेंद्र भोंडेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 15, 2024 | 07:14 PM
मंत्रिपद नाकारलं, आमदाराने थेट राजीनामाच दिला; शिंदेंच्या शिवसनेनेला मोठा धक्का

मंत्रिपद नाकारलं, आमदाराने थेट राजीनामाच दिला; शिंदेंच्या शिवसनेनेला मोठा धक्का

Follow Us
Close
Follow Us:

नागपूरमध्ये राजभवनात महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सुरू आहे. काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे तर मागच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. याचदरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस पाळलं नाही, त्यामुळे तीनदा आमदारकी भुषवणाऱ्या नरेंद्र भोंडेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात काही विद्यमान मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे ज्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात तीनदा आमदार म्हणून निवडून येणारे शिवसेनेचे नेते भंडारा- पवनी मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे.

नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी हा राजनामा दिला आहे. त्यामुळे भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12  आणि  राष्ट्रवादीच्या 10  मंत्री शपथ घेणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर जोरदार तयारी सुरू आहे. 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. त्यानंतर 33 वर्षांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात होत आहे.

प्रताप सरनाईक,भरत गोगावले, मंकरंद पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून मंत्रिपदाची इच्छाही त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली होती. अखेर देवेंंद्र फडणवीसांच्या तिसऱ्या कार्यकाळात भरत गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली आहे.  त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंकरंद पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

पंकजा मुंडे, जयकुमार रावल घेतली मंत्रिपदाची शपथ

भाजपचे जयकुमार रावल आणि गेल्या पाच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी अनकेदा बीडच्या नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. दरम्यान पंकजा मुंडे यांचे नाव घेताच समोर बसलेल्यात्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषही केला. 2014 ते 2019 या काळात पंकजा मुंडे  बालकल्याण आणि महिला विकास  या खात्याच्या मंत्री होत्या.

मंगलप्रभात लोढा यांनी गुजराती भाषेतून घेतली मंत्रिपदाची शपथ

शिवसेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचेधनंजय मुंडेयांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळख असलेले आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी गुजराती भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

Web Title: Shiv sena bhandara mla narendra bhondekar resigned because no chance in mahayuti cabinet expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 06:54 PM

Topics:  

  • maharashtra cabinet expansion

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.