Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muncipal Corporation Election 2025: शिवसेना शिंदे गटात युतीवर नाराजीचा सूर; श्रीकांत शिंदेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?

मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजप-महायुती युतीबाबत अजूनही मतभेद जाणवून येत आहेत. या मतभेदाचा फटका विरोधकांना काही ठिकाणी लागू शकतो, असे राजकीय सुत्रांकडून सांगितले जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 20, 2025 | 09:24 AM
Muncipal Corporation Election 2025:  शिवसेना शिंदे गटात युतीवर नाराजीचा सूर; श्रीकांत शिंदेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीकांत शिंदेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
  • मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजप-महायुती युतीबाबत अजूनही मतभेद
  • किशोर पाटील यांचा स्वबळाचा नारा

Muncipal Corporation Election 2025:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपमधील तणाव वाढत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षात युतीबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील शिवसेना पदाधिकारी यांनी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी युती धर्म मित्र पक्षाकडून पाळली जात नसल्याचा आरोप करत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन पक्षाची नुकसानकारक भूमिका सुरू असल्याची माहिती नेत्यांसमोर मांडली. याशिवाय, नंदूरबारमधील आमदाराने माजी जिल्हाप्रमुख भाजपसाठी काम करत असल्याचे सांगत पक्षातील नेत्यांचे लक्ष झारीतील ‘शुक्राचार्यांकडे’ वेधले.

ठाणे क्षेत्रात शिवसेना-भाजप युतीत संभ्रम

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम आहे. दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्च्यांची बांधणी सुरू असल्याचे वृत्त आहे. ठाण्यातील संजय केळकर, नवी मुंबईतून गणेश नाईक आणि इतर भाजप नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत होणाऱ्या वक्तव्यांमुळे शिवसेना नेत्यांकडून खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्वबळाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीत मतभेद

मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजप-महायुती युतीबाबत अजूनही मतभेद जाणवून येत आहेत. या मतभेदाचा फटका विरोधकांना काही ठिकाणी लागू शकतो, असे राजकीय सुत्रांकडून सांगितले जात आहे. सध्या तीनही पक्षांतील समन्वय बैठकांमधून तोडगा निघण्याची शक्यता कमी असून, फक्त वरिष्ठ नेत्यांच्या थेट हस्तक्षेपामुळेच हा तिढा सुटू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. लवकरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागांच्या बैठका होणार असून, तरीही या विभागातील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत मतभेद कायम असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सक्रिय भूमिका आवश्यक आहे.

जळगावमध्ये महायुतीत मिठाचा खडा

जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघांमध्ये महायुतीत मतभेद स्पष्ट दिसत आहेत. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर भाजपनेही आता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप स्वबळावर थेट संघर्षाच्या रूपात लढवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच, हिंगोलीतही शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून, याबाबत आमदार संतोष बांगर यांनी माहिती दिली आहे.

 

Web Title: Shiv sena shinde faction expresses displeasure over alliance what exactly happened in shrikant shindes meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • BMC Elections 2025

संबंधित बातम्या

निवडणुकांच्या रणनितीमध्ये महायुती आघाडीवर; महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?
1

निवडणुकांच्या रणनितीमध्ये महायुती आघाडीवर; महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राच्या मतदार यादीत सर्वाधिक भोंगळ कारभार; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
2

महाराष्ट्राच्या मतदार यादीत सर्वाधिक भोंगळ कारभार; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.