Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : हेच १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडलं तर बघा; उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेवरून असं का म्हणाले?

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. याच लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीला आज टोला लगावला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 08, 2024 | 11:50 PM
हेच १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडलं तर बघा; उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेवरून असं का म्हणाले?

हेच १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडलं तर बघा; उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेवरून असं का म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. याच लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीला आज टोला लगावला आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावरून जालन्यातील प्रचारसभेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला. आपण तिघे भाऊ भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. तुम्हाला लाज लज्जा शरम नावाची बाब थोडीफार राहिली असेल तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा. नाही थोबाड फोडलं तर मला विचारा, असा टोला लगावला आहे.

हेही वाचा-Nana Patole : ‘ब्लू फिल्मचं काम चालणारी बदलापूरची ती शाळा RSS शी संबंधित’ : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

संपूर्ण महाराष्ट्रात आता मशाल धगधगत असून हे खोके सरकार आहे. मी मात्र जनतेच्या न्यायालयात आलो आहे. गेली दोन वर्ष झाले, तारीख पे तारीख सुरू आहे. सरन्यायाधीश आता निवृत्त झाले आहेत. निकाल कधी मिळणार आहे की नाही? न्याय म्हणून काही गोष्ट या देशात आहे की नाही? संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय का मिळत नाही? राज्यपालांनी बोलावलेलं अधिवेशन बेकायदा होतं हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे.

आज अमित शहा यांची प्रचार सभा झाली. माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात. पण पराभवाची गॅरंटी म्हणजे अमित शहा. अमित शहा देशाच्या गृहमंत्रिपदावर राहू शकतात का? हे गद्दार पळाले होते, मात्र औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर कोणी केलं? आपण केलं, माझ्यावर टीका करण्याच्या आधी तुमच्या बुडाखाली काय पेंडिंग आहे ते बघा, अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर तोफ डागली.

हेही वाचा-Maharashtra Election 2024: महाराष्ट्राला डावलून गुजरातच्या कांद्यांच्या निर्यातीला प्राधान्य का? काँग्रेसचा मोदींना खडा सवाल

७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवार यांच्यावर नरेंद्र मोदींनी केला होता. आता त्यांचा प्रचार करतात. ज्या तोंडाने आरोप केले, त्याच तोंडाने सांगतात अजित पवार किती चांगले आहेत. आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे, असंही ते म्हणाले आहेत.

यांचं काम केवळ विकासकामांना स्थगिती देणं : शिंदे

आज एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी आहे. अडीच वर्षात त्यांनी केवळ विकासकामांना स्थिगिती देण्याचं काम केलं, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला होता धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे.  उस्मानाबादच नामकरण धाराशिव करण्याच भाग्य आल्याला मिळाल्याचं म्हटलं होतं. पूर्ण बहुमताचं सरकार आणल्यानंतर उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छञपती संभाजीनगर नामकरण करून बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Web Title: Shiv sena ubt leader uddhav thackeray criticized mahayuti over ladki bahin yojana and women safety in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 11:50 PM

Topics:  

  • Badlapur case
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत
1

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी
2

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी

लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; ‘या’ स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या
3

लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; ‘या’ स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट, योजनेतील लाभार्थ्यांना करावं लागणार ‘हे’ काम
4

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट, योजनेतील लाभार्थ्यांना करावं लागणार ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.