
Shiv Sena Uday Samant Pune Press Conference on Local Body Elections 2026
Local Body Elections : पुणे : पुण्याचा महापौर बनवताना शिवसेनेला विचारात घ्यावच लागेल असे उद्योग मंत्री शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले. ते पुण्यातील महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी पुणे येथे बोलत होते.
यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे,आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष नाना भानगिरे तसेच सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उदय सामंत म्हणाले की, पुण्याच्या राजकारणाचे इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना 120 जागांवर लढत आहे. शिवसेनेला कोणी कमी समजू नये. शिवसेना एकच्या पन्नास जागा कशा निवडून आणते ते 16 तारखेलाच कळेल.
शिवसेनेला उमेदवार मिळणार नाहीत असे काही जण म्हणत होते ,एक दिवस मिळाला असता तर 165 उमेदवार उभे केले असते असे उदय सामंत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तेरा दिवसात समोरच्याचा तेरावा घालायचा आहे, अशा पद्धतीचा प्रचार करा असा संदेश सामंतांनी दिला. संपूर्ण शहरात भगवं वातावरण आहे. कसबा गणपती, दगडूशेठ गणपती शिवसेने वरती संकट येऊ देणार नाही. धंगेकरांनसोबत जैन मंदिरात देखील जाऊन आलो. आजपासूनच प्रचाराला लागा, नवीन उमेदवारांच्या मागे धनुष्यबाण असेल तर जनता मागे उभी राहते. पुण्यात मी राहिलेलो आहे त्यामुळे पुणेकरांना काय हवं आहे तेच आम्ही देणार आहोत, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी
चांदणी चौक, नवले ब्रीज वरील समस्या सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मला पाठवलं होतं. विकासाचे काम फक्त एकनाथ शिंदे करू शकतात. वाहतुकीचा प्रश्न, कात्रज विकास आराखडा तसेच उपनगरातील गावातील कामे एकनाथ शिंदे करू शकतात असे सामंत म्हणाले.
रात्री अकरा वाजता प्रचार शुभारंभ कार्यक्रम घेण्याचे ठरल्यानंतर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक इथे उपस्थित राहिले हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर तुम्हाला सोळा तारखेलाच कळणार असल्याचे सामंतांनी सांगितले.
ही लढाई शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती
ही लढाई शिवशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे उदय सामान म्हणाले परंतु धनशक्ती मध्ये कोण कोण आहेत हे सांगण्याची पुणेकरांना गरज नाही असे सामंत म्हणाले. महायुतीत खडा पडेल अशी वागणूक होता कामा नये असा सल्ला शिवसैनिकांना उदय सामंतांनी दिला आहे. एका जागेच्या 50 जागा कशा करायच्या हे शिवसैनिकांना माहिती आहे.
हे देखील वाचा : मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी
धनुष्यबाण आमचा उमेदवार
आपल्याला कोणावरती टीका करण्याची गरज नाही आपण फक्त विकासाचं बोलायचं, टीका करण्याचे काम अजितदादा करत आहेत असे सामंत म्हणाले.
शेवटपर्यंत भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होतो.
शेवटपर्यंत भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होतो, युती तुटली असे मी म्हणत नाही, त्यांना वाटले त्यांनी ते केले, आम्हाला विचारात घेतल्याशिवाय महापौर करता येणार नाही, असे सामंत म्हणाले. इतर लोक पत्रकार परिषदा घेण्यात व्यस्त असतील आपण विकासाचं काम करायचं लोकांपर्यंत पोहोचायचं असा संदेश त्यांनी दिला. पिंपरी चिंचवड मधील काही शासकीय कर रद्द केले. याचे श्रेय कोणीतरी घेत आहे परंतु प्रभारी नगर विकास मंत्री म्हणून हे काम मंत्री म्हणून मी केले आहे. त्यामुळे याचे श्रेय कोणी घेण्याची गरज नाही, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.