shloka and akash
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) व उद्योजिका नीता अंबानी पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका अंबानीने मुलीला जन्म (Shloka Ambani Blessed With A Baby Girl) दिला आहे. श्लोका ही आकाश अंबानीची पत्नी आहे. आकाश व श्लोका यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. अंबानींच्या घरात लेकीने जन्म घेतल्याने आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. (Ambani News)
मिळालेल्या माहितीनुसार, श्लोका अंबानीने आज 31 मे रोजी मुलीला जन्म दिला. श्लोका अंबानीने काही महिन्यांपूर्वीच गरोदर असल्याची गोड बातमी सांगितली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. श्लोका अंबानीचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही खूप व्हायरल झाले होते.
आकाश अंबानी व श्लोका अंबानी यांचं 2019 साली लग्न झालं. त्यानंतर 2021 साली श्लोकाने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव पृथ्वी असं आहे. त्यानंतर आता आकाश व श्लोका पुन्हा एकदा आईबाबा झाले आहेत. त्यांना मुलगी झाली आहे. श्लोका अंबानी व आकाश अंबानी यांनी कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वीच सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यावेळी श्लोका बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.
एनएमएसीसीच्या कार्यक्रमात कपलची हजेरी
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (NMACC) लॉन्चवेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबही उपस्थित होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसत होता. अर्थात त्याचं कारणही तसंच होतं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता पुन्हा एकदा गरोदर असल्याचं समजलं होतं. श्लोका मेहता आणि तिचा पती आकाश अंबानी या कार्यक्रमात थोडा उशीरा पोहोचले, दोघेही ट्रेडिशनल लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते . यावेळी त्यांनी पापाराझींना सुंदर पोजही दिली. इव्हेंटमध्ये श्लोकाने शिमरी गोल्डन साडी आणि त्या जोडीला गुलाबी दुपट्टा परिधान केला होता. या शिमरी गोल्डन साडीमध्ये श्लोका खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. साडीसोबतच तिने मांग टिका, कानातले आणि बिंदीने तिचा लूक पूर्ण केला होता.तर दुसरीकडे आकाशने बॉटल ग्रीन कुर्ता आणि एम्ब्रॉयडरी जॅकेट घातले होते, ज्यामध्ये तो देखणा दिसत होता.