
Sangli News : बलवडी फाट्याजवळ भीषण अपघात; कारच्या धडकेत महिला पोलिसाचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. काही दिवसांपूर्वी शाळेची सहल घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला होता. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही. त्याचबरोबर चिपळूणलगतच एका टेम्पोचा भीषण अपघात झाला होता. याचपार्श्वभूमीवर आता गोवा माहामर्गाजवळील दोडामार्ग या ठिकाणी 7 वर्षीय शाळकरी मुलीचा अपघात झाला आहे. दोडामार्ग वीजघर झरेबांबर तिठा भागात शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात श्रिया संदीप गवस (रा. मांगेली) या ७ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक लागली. भरधाव वेगात येणाऱ्या या टेम्पोचं चाक या मुलीच्या डोक्यावरुन गेलं.या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जत्रेला आईसोबत आलेल्या या मुलीने जागीच प्राण सोडला.या दूदैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर टेम्पो चालक सुरेश पुंडलिक पवार याला नागरिकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चालकाला ताब्यात घेतले. संतप्तच जमावाने पोलिसांना धारेवर धरले होते.यावेळी भाजपा उपाध्यक्ष , माजी जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर आणि पाोसिल यांच्यात शब्दिक चकमक झाली.
Nagpur: दारु पिऊन दुचाकीने स्टंटबाजी, दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्…
तिलारी घाट रस्ता अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मात्र असं असूनही भरधाव वेगात गाड्या या मार्गावरुन जातातच कशा? स्थानिक पोलिलसांतच्या हलगर्जीपणामुळे देखील अपघाताचं प्रमाण वाढत आहे, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या अपघातास टेम्पो चालक जबाबदार आहे त्यामुळे चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करावा , अशी मागणी जमावाने केली.
पुण्यात मोठा अपघात, भरधाव कारची 4 वाहनांना धडक; नागरिकांची कारवर दगडफेक
झरेबांबर गावच्या जत्रेला सुरुवात झाली असून सात वर्षाची मुलगी आणि तिची आई जत्रेसाठी आले होते. शुक्रवारी मांगेली येथे आपल्या घरी परतण्यासाठी झरेबांबर तिठा या ठिकाणी मायलेकी आल्या होत्या. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या टेम्पोच्या चाकाखाली या मुलीचं डोकं चिरडलं गेलं. या अपघातात मृत्यू झालेल्या या मुलीच्या पश्चात आई- वडील, एक बहीण, भाऊ, आजी ,आजोबा असा परिवार आहे. झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान जड वाहनांना प्रवेशबंदी असताना देखील खुलेआमपणे भरधाव वेगाने गाड्यांची ये जा सुरु असते, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसयंत्रणेने याबाबत ठोस अंमलबजावणी करावी अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.