धक्कादायक ! लग्न मंडपातच तरुणाची निर्घृण हत्या; किरकोळ कारणावरून तरूणाला संपवलं
अहमदनगर/राहुरी : अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरीमध्ये एक खळबळजनक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. एका माथेफिरू जावयाने आपल्या बायकोला व सासूला पहार डोक्यात घालून ठार केले. त्यानंतर स्वतः आत्महत्या करीत जीवन संपवले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सासू आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात
राहुरी तालुक्यात बुधवारी पहाटे ही घटना कात्रड येथे उघडकीस आली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावून घटनेची माहिती दिली. घरजावई म्हणून राहत असलेल्या पती सागर साबळे याने पत्नी नूतन सागर साबळे वय 23 व तीची आई सुरेखा दिलीप दांगट वय 45 ठार यांना झोपेत असताना, डोक्यात पहार घालून ठार केले. त्यानंतर स्वतः जाऊन आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेने परिसरात भयाण शांतता पसरली आहे.
कौटुंबिक कलहातून केले खून
घर जावाई म्हणून राहत असलेल्या सागर साबळे याने कौटुंबिक कलहातून पत्नी व सासूला ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजय जाधव हे करीत आहेत.