मुंबई : मुंबईकरांसाठी श्रद्धा स्थान असलेलं सिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple)मंदिरांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. प्रभादेवी परिसरात असलेलं मंदिर आजपासून पाच दिवसांसाठी बंद असणार आहे. याचं कारण म्हणजे सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
[read_also content=”महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुटणार का? आज दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी https://www.navarashtra.com/india/eknath-shinde-basavraj-bommai-will-meet-to-amit-shah-in-delhi-today-nrps-353417.html”]
श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी म्हणजे 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे भक्तांना आता पाच दिवसांसाठी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही आहे. या कालावधीमध्ये सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तर, 19 तारखेला गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्यातून दर्शन घेता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
[read_also content=”राज्याच्या नव्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती https://www.navarashtra.com/maharashtra/senior-lawyer-dr-as-the-new-advocate-general-of-the-state-appointment-of-birendra-saraf-353413.html”]