Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Slapur Crime: आजोबांनी सांगितलं अन् चोरीचं गूढ उकललं; मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने जे केलं…

मोबाईल खरेदीची हौस इतकी महागात पडेल, याची कल्पनाही कदाचित या दोन दहावीतील मुलांना नव्हती. घरातील व्यक्तींच्या हालचालींची माहिती घेत एका मुलाने चक्क कपाटाची चावी शोधली आणि तीन लाखांच्या सोन्यावर डल्ला मारला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 13, 2026 | 04:36 PM
Slapur Crime: आजोबांनी सांगितलं अन् चोरीचं गूढ उकललं; मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने जे केलं...

Slapur Crime: आजोबांनी सांगितलं अन् चोरीचं गूढ उकललं; मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने जे केलं...

Follow Us
Follow Us:
  • दहावीतील मुलांनी केली मोबाईलसाठी चोरी
  • अडीच तोळे सोन्याचा ऐवज पोलिसांनी केले जप्त
  • आजोबांच्या दिलेल्या माहितीने उलगडा
सोलापुर: सध्याच्या काळात लहान मुले आणि तरुणाई मोबाईलच्या आहारी जात असल्याचे चित्र अनेकदा समोर येते. सोलापुरात मात्र मोबाईल खरेदीच्या हव्यासापोटी दहावीतील दोन अल्पवयीन मुलांनी थेट चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे अडीच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा:Baramati News: पिस्तुल काढले अन् डोक्यात झाडली गोळी; गोळीच्या आवाजाने अपार्टमेंट हादरले,२८ वर्षीय तरुण गंभीर

घराची चावी पायपुसणीखाली असल्याची माहिती

संतोष बिराजदार (रा. सनथ नगर, सोलापूर) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपींपैकी एका मुलाचे बिराजदार यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे घरातील काही बाबींची त्याला माहिती होती. घराची चावी पायपुसणीखाली ठेवली जात असल्याचेही त्याला माहीत होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने चावी घेत घर उघडले. त्यानंतर कपाटातील लॉकर तोडून नेकलेस, अंगठी, कर्णफुले असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरला. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर त्याने घराला पुन्हा कुलूप लावले आणि चावी नेहमीप्रमाणे पायपुसणीखाली ठेवून दिली.

हेही वाचा:‘मनःशांती मिळाली’ म्हणत पत्नीने पतीला संपवलं; पतीची हत्या अन् मृतदेहाची चिरफाड, काढलेले अवयव देवीला अर्पण करून तिला…

आजोबांनी दिलेल्या माहितीने तपासाला दिशा

घरातील सोने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर बिराजदार यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील माहिती घेत तपास सुरू केला. त्यावेळी घरातील आजोबांनी शेजारचा एक मुलगा घरी आला असल्याचे पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीच्या चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मोबाईल खरेदी करण्यासाठी ही चोरी केल्याचेही त्याने मान्य केल्याचे तपासात समोर आले.

हेही वाचा:Crime News: महाबळेश्वरातून लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेल्या संशयिताला अटक; मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

पहिलाच गुन्हा असल्याचे तपासात स्पष्ट

या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मोबाईल घेण्याच्या इच्छेतून दहावीतील विद्यार्थ्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले असून, त्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोन्ही अल्पवयीन मुलांकडून चोरीबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

Web Title: Solapur crime class 10 students rob their own home for a mobile phone gold worth 3 lakh stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.