Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर उभारले सोलर पॅनल, वीज बिलापासून मुक्ती

पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. त्यासाठी ४७ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यासंदर्भात जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी माहिती दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 11, 2024 | 12:18 PM
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर उभारले सोलर पॅनल, वीज बिलापासून मुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख २८ हजार ६१५ रुपये सोलर पॅनल बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. सोलर पॅनल, टॉवर एसी आणि कॅन्टींगसाठी सातत्याने जिल्हा पत्रकार संघाने पाठपुरावा केल्याने एकूण ४७ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. आता पत्रकारांनी पर्यावरणाचा संदेश देत सोलर पॅनल बसवत एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे पत्रकार भवनातील या सोलर पॅनलमुळे वीज बिल मुक्ती मिळून व्यवस्थापन खर्च कमी होईल, अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली.

[read_also content=”विनोद तावडेंची भाजपमध्ये ‘पॉवर’ वाढणार; चंद्रकांत पाटील यांचे महत्त्वपूर्ण विधान https://www.navarashtra.com/maharashtra/will-bjp-maharashtra-leader-vinod-tawde-be-next-national-president-of-bjp-chandrakant-patil-important-statement-nrpm-546045.html”]

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भावनामध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर उर्वरित कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तातडीने जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर भवनांच्या इमारतीवर सोलर पॅनल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून या इमारतीमध्ये कॅन्टीन उभारण्यासाठी १८ लाखाचा निधी देखील समितीमधून देण्यात आला असून लवकरच कार्यारंभ आदेश मिळणार आहे. या सभागृहांमध्ये पत्रकार सभासदांच्या सूचना आल्यानंतर तातडीने टॉवर एसी मागणी जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन तातडीने ६ टॉवर एसी मंजूर करण्यात आले असून त्यासाठी ९ लाख ४० हजार ९१८ रुपये निधी जिल्हा नियोजनामधून देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने सोलर पॅनल, टॉवर एसी आणि कॅन्टींगसाठी सातत्याने पाठपुरावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक ,आमदार नितेश राणे आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे केला होता. त्यामुळे तब्बल ४७ लाखांचा निधी मंजूर झाला असून कामे पूर्णत्वास जात आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधावळे, श्री. पवार आणि बांधकाम कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचेही चांगले सहकार्य मिळाले. जिल्हा नियोजनामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी आभार मानले.

Web Title: Solar panel erected on balshastri jambhekar journalist bhavan building free from electricity bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 12:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.