Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपलब्ध होणाऱ्या वाहनांमुळे घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होईल – केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

स्वच्छ भारत मिशन १ व २ मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकरीता इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आणि त्याच्या बळकटीकरणाचे काम महानगरपालिकेमध्ये चालू आहे, बुधवारी आपल्याला ११ डंपर प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला १३ आर.सी. गाड्या मिळतील, ४३ घंटा गाड्या पुढील महिन्यात प्राप्त होतील. त्याचप्रमाणे २ धूळ प्रतिबंधक वाहने प्राप्त होत आहेत, त्याचबरोबर ४ मॅकेनिकल स्विपर देखील महापालिकेच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. ही सर्व वाहने उपलब्ध झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 26, 2023 | 08:59 PM
solid waste management will become more efficient due to available vehicles kdmc commissioner dr bhausaheb dangde nrvb

solid waste management will become more efficient due to available vehicles kdmc commissioner dr bhausaheb dangde nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण :उपलब्ध होणाऱ्या वाहनांमुळे घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) अधिक सक्षमपणे होईल असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे (KDMC Commissioner Dr Bhausaheb Dangde) यांनी आज काढले. महापालिका मुख्यालया नजीकच्या जवळच्या सुभाष मैदानात, घनकचरा विभागात उपलब्ध झालेल्या ११ सीएनजी डंपर गाड्यांचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

स्वच्छ भारत मिशन १ व २ मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकरीता इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आणि त्याच्या बळकटीकरणाचे काम महानगरपालिकेमध्ये चालू आहे, बुधवारी आपल्याला ११ डंपर प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला १३ आर.सी. गाड्या मिळतील, ४३ घंटा गाड्या पुढील महिन्यात प्राप्त होतील. त्याचप्रमाणे २ धूळ प्रतिबंधक वाहने प्राप्त होत आहेत, त्याचबरोबर ४ मॅकेनिकल स्विपर देखील महापालिकेच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. ही सर्व वाहने उपलब्ध झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. नवीन वाहने खरेदी केली आहेत ती सी.एन.जी. वर चालणार आहेत. आणि त्यातून प्रदूषण कमी होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

[read_also content=”आमची ताई आहेच ‘एकदम भारी’ “मॅडम एक और… तुम भी खाओगे” म्हणत प्रियांका गांधींनी रेस्टॉरंटमध्ये बनवला एकस्ट्रा डोसा, व्हिडिओ व्हायरल https://www.navarashtra.com/viral/priyanka-gandhi-congress-general-secretary-took-a-break-from-election-rallies-and-made-dosa-at-mylari-restaurant-mysore-video-viral-nrvb-391977.html”]

स्वच्छ भारत मिशन – १ अंतर्गत प्रत्येक प्रभागासाठी १ याप्रमाणे १० मोबाईल टॉयलेट युनिट आपण खरेदी करत आहोत. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन – २ अंतर्गत महापालिकेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. यामधून सीएनजी डंपर गाड्या चालविल्या जाणार असून त्यामुळे महापालिकेच्या खर्चात व इंधन वापरात बचत होणार असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

[read_also content=”इथं-तिथं आहे यांच्याच नावाची चर्चा, ज्यांनी IPL च्या मैफलीत लावलेत चार चाँद https://www.navarashtra.com/web-stories/hottest-female-anchors-in-ipl-2023-sanjana-ganesan-ridhima-pathak-nashpreet-kaur-mayanti-langer-nrvb/”]

या लोकार्पण समयी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी, वाहन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Solid waste management will become more efficient due to available vehicles kdmc commissioner dr bhausaheb dangde nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2023 | 08:59 PM

Topics:  

  • Solid Waste Management

संबंधित बातम्या

मुंबई स्वच्छतेकडे मोठं पाऊल! कचऱ्याची विल्हेवाट आता स्मार्ट गाड्यांनी; ९८८ नव्या वाहनांची एंट्री
1

मुंबई स्वच्छतेकडे मोठं पाऊल! कचऱ्याची विल्हेवाट आता स्मार्ट गाड्यांनी; ९८८ नव्या वाहनांची एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.