son of the chief minister of gujarat suffered a brain stroke 37 year old anuj was shifted to mumbai by air ambulance nrvb
मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Chief Minister of Gujarat Bhupendra Patel) यांचा एकुलता एक मुलगा अनुज पटेल (Son Anuj Patel) यांना अचनाक ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आला. त्यानंतर तातडीनं अनुज यांना अहमदाबादच्या केकेडी हॉस्पिटलमध्ये (KKD Hospital, Ahmedabad) दाखल करण्यात आलं. पुढचे उपचार करण्यासाठी सोमवारी सकाळी एअर एम्ब्युलन्सनं (Air Ambulance) अनुज यांना मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital Mumbai) शिफ्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पटेल हेही मुलासोबत मुंबईत दाखल झालेले आहेत.
३७ वर्षांचे अनुज पटेल यांना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना अहमदाबाादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांचं ऑपरेशनही करण्यात आलं. त्यानंतर अनुभवी डॉक्टरांच्या सल्ल्यानं अनुज यांना मुंबईत शिफ्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. सध्या अनुज यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. अनुज हे व्यवसायानं सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यांचा अहमदाबादमध्ये बांधकाम व्यवसाय आहे.
अनुज यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केडी हॉस्पिटलला भेट दिली. त्यांच्याच उपस्थितीत अनुज यांना एअर एम्ब्युलन्समधून मुंबईत शिफ्ट करपण्यात आलं. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही अनुज यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले आहेत.
आज गुजरात गौरव दिनही आहे. दिवसभरात राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जामनगरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पटेल जाणार होते. मात्र अचानक त्यांना मुंबईत यावं लागल्यानं या कार्यक्रमाला त्यांच्याऐवजी आता राज्यपाल जाणार आहेत.