पंढरीच्या वारीत एसटी झाली 'मालामाल'; महामंडळाला मिळाले तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न
मुंबई : यंदा आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी शेकडो बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन घडवण्यासाठी 5 हजार 200 ज्यादा बसेस सोडल्या होत्या. त्याचा फायदा तब्बल 9 लाख 71 हजार 683 भक्तांनी घेतला. त्यातून एसटीला 35 कोटी 87 लाख 61 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहनमंत्री सरनाईक यांनी वारी कालावधीत मिळालेल्या एसटी महामंडळाच्या उत्पनाची माहिती दिली. विठुरायाचे दर्शन घडवण्यासाठी 5 हजार 200 ज्यादा बसेस सोडल्या होत्या. त्याचा फायदा तब्बल 9 लाख 71 हजार 683 भक्तांनी घेतला. त्यातून एसटीला 35 कोटी 87 लाख 61 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा अधिक असल्याची माहिती दिली. या सर्व प्रवाशांची एसटीच्या चालक, वाहकांनी सुरक्षितपणे ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त राज्यातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविक वारीसाठी येत असतात. या भाविकांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी यंदा एसटीने 3 ते 10 जुलै दरम्यान, तब्बल 5 हजार 200 ज्यादा बसेस सोडल्या होत्या.
एसटी बसेसने केल्या 21499 फेऱ्या पूर्ण
या बसेसनी 21 हजार 499 फेऱ्या करून तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविकांची सुरक्षित ने-आण केली. त्यातून एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले, जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपयांनी जास्त असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी प्रशासनाकडून केली गेली जोरदार तयारी
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. त्यासाठी मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक रवाना होतात. राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने यासाठी नियोजन केले होते. त्यासाठी तब्बल दहा दिवस दररोज १३५ बसेस संभाजीनगरमधून धावल्या. त्यानंतर आता या बसेसच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती दिली जात आहे.
वाढीव बसेस सोडल्या
ऐनवेळी जास्त गर्दीमुळे मागणी वाढली तर तात्काळ वाढीव बस सोडल्या जाणार असल्याची माहिती एसटीने दिली होती. त्यानुसार, काही ठिकाणी या ज्यादा बसेस सोडण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानक आगारातून पंढरपूरला रवाना होणाऱ्या प्रवाशांसाठी २५. सिडको बसस्थानक येथून ३०, पैठणहून २०, सिल्लोड येथून २०, वैजापूरहून १०, कन्नडहून १०, गंगापूर येथून १० तर सोयगाव बस्टेंडवरून १० अशा १३५ बस रवाना झाल्या होत्या.