
Dimbhe Manikdoh Tunnel, Kukadi Irrigation Project, Dilip Walse Patil
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ५,७०४.५० कोटी रुपयांच्या (पाच हजार सातशे चार कोटी पन्नास लाख) चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये या बोगद्याचा नव्याने समावेश करण्यात आला होता. मात्र, या बोगद्यामुळे स्थानिक शेतीचे हक्काचे पाणी पळवले जाईल, अशी तीव भीती व्यक्त करत तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला होता.
बोगद्याच्या कामाला स्थगिती मिळावी यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना व पाणीहक्काची वस्तुस्थिती मांडली होती. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बोगद्याचे काम थांबवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले होते. या तीव्र विरोधानंतर मंत्रिमंडळाने या बोगद्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून, आता लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
● डिंभे-माणिकडोह बोगद्याला मिळालेली स्थगिती हा शेतक-यांच्या एकजुटीचा आणि संघर्षातील महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, अंतिम तोडगा अद्याप बाकी असून, आचेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमचा लढा व पाठपुरावा पुढेही असाच सुरू राहील.
– दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री.
Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की
या निर्णयासोबतच स्थानिक सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध मागण्यांवर भर देण्यात आला आहे।
६५ कोल्हापूर पद्धतीच्या बंधायांसाठी २.५५ टीएमसी पाणी आरक्षित करणे.
कळमजाई, बोरघर, फुलवडे व म्हाळसाकांत उपसा जलसिंचन योजनांचा प्रकल्पात समावेश करणे.
डिभे डाव्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करणे.
पावळ-केंदूर परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणे.
माणिकडोह परिसरातील बुडीत बंधाऱ्यांचा सिंचन प्रकल्पात समावेश करणे.