Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

शाळेत दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर शाळेजवळील किराणा दुकानातून जलजीरा विकत घेतला. हा जलजीरा प्यायल्यानंतर काही वेळातच मुलींना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 22, 2025 | 09:10 AM
जलजीरा प्राशनाने ७ मुलींना विषबाधा

जलजीरा प्राशनाने ७ मुलींना विषबाधा

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.20) दुपारच्या सुमारास घडली. 10 ते 11 वयोगटातील मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाळेत दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर शाळेजवळील किराणा दुकानातून जलजीरा विकत घेतला. हा जलजीरा प्यायल्यानंतर काही वेळातच मुलींना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर मुख्याध्यापिका अंजना हरीणखेडे यांनी त्वरित लक्ष देत मुलींना कुराडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना केवळ पाथरीपुरती मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण भागातील किराणा व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जलजीरा ‘एक्सपायर्ड’ होता आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या विद्यार्थिनींना विषबाधा झाली, त्यांची नावे आरजू कटरे, अंशिका कडाम, निधी नागफासे, प्राची येळे, स्वाती मेश्राम, चेतना साडीले, त्रिशा अशी आहेत. संबंधित जलजीरा किराणा स्टोअर्समधून घेतल्याचे समोर आले.

तत्काळ कारवाई अपेक्षित

ग्रामीण भागातील अनेक दुकानांमध्ये कालबाह्य वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून अन्न व औषध प्रशासन, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त तपास करून कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांची आहे.

दुकानावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी

गावकऱ्यांनी दुकानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी भावना ग्रामस्थांची आहे. शाळेच्यावतीने गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस दुकानदाराकडे वैध परवाना आहे की नाही, इतरही कालबाह्य वस्तू दुकानात आहेत का? याचा तपास करत आहेत.

Web Title: Students got poisoned after drinking jaljeera incident in gondia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • food poisoning news
  • gondia news

संबंधित बातम्या

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
1

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
2

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
3

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
4

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.