“सचिवांना बांधून सभागृहात आणा”; सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात असं का म्हणाले?
मुंबई: बदलापूर अल्पवयीय मुलींच्या अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा काल मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. मुंबईतील मुंब्रा बायपास महामार्गावर हा थरार घडला. पण या प्रकऱणानंतर विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर टीकेचा आसूड ओढायला सुरूवात केली आहे. अक्षय शिंदेचा जाणीवपूर्वक एन्काऊंटर केल्याचा आरोप विरोधकांकडून कऱण्यात येतआहेत. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना खड़े बोल सुनावले आहेत.
“अक्षय शिंदे दृष्ट बुद्धीचा अत्याचारी होता त्याने पोलिसांवर हल्ला केल्यावर त्याच्यावर सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे. प्रत्यक्ष उपस्थित नसताना सहानुभूती व्यक्त करतात हे आश्चर्यकारक. विरोधक आधी अत्याचारी अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणत होते. पण आता तेच लोक पोलिसांच्या जिवावर उठले आहेत आणि त्याच्यावर सहानुभूती दाखवत आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवायचा नाही का, पोलीस राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही. मतांसाठी विरोधक काय करतील याचा भरोसा नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा: हजार रुपयांच्या बॅटची लालबागच्या दरबारात लागली बोली,
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ” निवडणुकीसाठी सूक्ष्म निरीक्षण करून निवडणूक सकारात्मक करण्यासाठी अमित शाहांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी ज्या ज्या भागात जबाबदारी दिली, तिथे भाजपला यश मिळाले.
महायुतीत भाजप आणि शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बाजूला कऱण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार यांच्याबाबत महाविकास आघाडीकडून खोटा नेरेटिव्ह पसरवला जात आहे. पण अजितदादांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची आमची तयारी असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: अक्षय शिंदे एन्काऊंटर करणारे कोण आहेत पोलीस निरीक्षक संजय शिंदे?
तसेच, आधी अजित पवार यांचे आमदार मविआ मध्ये येणार असा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे आता दुसऱा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यात महाविकास आघाडीचा कोणीही हात पकडू शकत नाही. त्यांना ऑलम्पिक मध्ये गोल्ड मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर सिद्धीविनायक मंदिराच्या प्रसादाच्या बाबतीत जो व्हिडीओ प्रसारित होत आहेत, त्याचीह चौकशी सरकारकडून केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.