मुंबईचा राजा म्हणून लालबागच्या गणपतीची ओळख आहे. गणेशोत्सवानिमित्त, दरवर्षी देशातूनच काय तर परदेशातूनही अनेक भक्त लालबागच्या दर्शनासाठी येत असतात. गणेश चतुर्थीपासून पुढील 10 दिवस राजाच्या दरबारी लाखो भाविक दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे असतात. अनेकजण नवस करायला तर काही फेडायला लालबागच्या चरणी येत असतात. तसेच दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी लाखोंची देणगी आणि दान केले जाते.
यंदा दहा दिवसांमध्ये लालबागचा राजाच्या चरणी कोट्यावधी रुपयांचे दागिने, भेटवस्तू दान स्वरूपात आल्या, याच दान स्वरूपात आलेल्या वस्तूंचा नुकताच लिलाव करण्यात आला, ज्यात एका एक हजार रुपयांच्या क्रिकेटच्या बॅटचा समावेश होता. आता लालबागच्या चरणी अर्पण केलेल्या या हजार रुपयांची किंमत लिलावात इतकी करण्यात आली की फायनल किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो फार व्हायरल झाला आहे.
हेदेखील वाचा – चिमुकलीने सापाला दाखवला इंगा, ओढून बाहेर काढले अन्… मुलीचे धाडस पाहून आवाक् व्हाल, पाहा Viral Video
भक्तांमध्ये लालबागविषयी एक वेगळेच आकर्षण आहे. हजारो भाविक श्रद्धा म्हणून लाख मोलाच्या किमतीचे दागिने, मूर्त्या आणि अनेक वस्तू भेट देतात. यात दागिन्यांचा आणि वस्तूंचा समावेश असतो. दरम्यान नुकताच या सर्व वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात राजाच्या चरणी अर्पण झालेली क्रिकेटची बॅट मंडळाच्या वतीने एक हजार रुपये किमतीने ठेवण्यात आली होती. यानंतर लिलावात सुरुवातीला या बॅटची किंमत दोन हजारांपासून करण्यात आली होती. यानंतर बोली पाच हजार, दहा हजार असे करत अवघ्या पंधरा हजारांपर्यंत पोहचली आणि शेवटी या एक हजाराच्या बॅटला एका व्यक्तीने पंधरा हजारांना खरेदी केले.
हेदेखील वाचा – महाकाय अजगर आणि मगरीमध्ये रंगली भयानक लढत, जबड्यात पकडून गरागरा फरवले अन्… थरारक Video Viral
दरवर्षी लालबागचा राजाच्या चरणी अर्पण झालेल्या अनेक लहान-मोठ्या वस्तूंचा लिलाव केला जातो, ज्यात अनेक जण राजाची आठवण म्हणून यातील वस्तू लिलावातून खरेदी करतात. या लिलावाचा व्हिडिओ @mjreels नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेक लोकांनी पसंती दाखवली असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.