Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर कारखान्याला मिळणार आता सॉफ्ट लोन; पोफाळीच्या वसंत साखर कारखान्यालाही अनुदान

पुढील सात वर्षांसाठी सुमारे ७३८ कोटी ५१ लाख रुपयांच्या एकूण व्याज अनुदानालाही मान्यता देण्यात आली आहे. अधिकृत गाळप नोंदीनुसार, २०२५-२६ हंगामात भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडने भाडेतत्त्वावर वसंत सहकारी साखर कारखाना चालवला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 17, 2026 | 01:39 PM
साखर कारखान्याला मिळणार आता सॉफ्ट लोन; पोफाळीच्या वसंत साखर कारखान्यालाही अनुदान

साखर कारखान्याला मिळणार आता सॉफ्ट लोन; पोफाळीच्या वसंत साखर कारखान्यालाही अनुदान

Follow Us
Follow Us:

यवतमाळ : राज्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सॉफ्ट लोन योजनेला मंजुरी दिली. २०२५-२६ गाळप हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम अदा करण्यासोबतच २०२६-२७ माळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, हा या मोजनेचा प्रमुख उद्देश आहे. पात्रतेच्या अटी पूर्ण झाल्यास या योजनेचा लाभ उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यालाही मिळू शकतो.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, पुढील सात वर्षांसाठी सुमारे ७३८ कोटी ५१ लाख रुपयांच्या एकूण व्याज अनुदानालाही मान्यता देण्यात आली आहे. अधिकृत गाळप नोंदीनुसार, २०२५-२६ हंगामात भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडने भाडेतत्त्वावर वसंत सहकारी साखर कारखाना चालवला. या हंगामात कारखान्याने १ लाख १६ हजार ९१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, साखर उतारा ९ टक्के नोंदवण्यात आला आहे.

738 कोटी रुपयांच्या एकूण व्याज अनुदानालाही मान्यता

वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींमुळे चर्चेत राहिला आहे. दीर्घकाळ बंद असलेल्या कारखान्याचे भाडेतत्त्वावर पुनरुज्जीवन करण्यात आले, २०१९ मध्ये कारखान्यावर सुमारे १२० कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी कारखाना संचालक व व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू असल्याने एकूण कर्जाच्या रकमेत घट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी

ज्या पात्र सहकारी साखर कारखान्यांकडे चकीत एफआरपी नाही, त्यांना या कर्जाचा वापर २०२६-२७ गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी करता येणार आहे. त्यामुळे हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्याना आवश्यक आर्थिक निधी उपलब्ध घेण्यास मदत होईल.

थकीत FRP अदा करण्यासाठी करणे बंधनकारक

शासनाच्या नव्या सॉफ्ट लोन योजनेत मंजूर होणाऱ्या कर्जाचा वापर प्रामुख्याने साखर कारखान्यांवरील थकीत एफआरपी अदा करण्यासाठी करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे वसंत सहकारी साखर कारखान्याकडे पात्र थकीत एफआरपी असल्यास, या योजनेमुळे संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची धकीत देणी मिळण्यास मदत होऊ शकते.

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Web Title: Sugar factory to get soft loan now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 01:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.