पुणे : आज राष्ट्रवादीच्या खासदार प्रमुख नेत्या सुप्रिया सुळेंनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना, अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडत, त्यांना कामे करण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यातील पाणी प्रश्न सरकार, भ्रष्ट जुमला पार्टी, नगरविकास खाते व सिंचन विभागाने सोडवला पाहिजे, एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी हे केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
अजित पवारांना जोरदार पलटवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांचे वय काढले जाते, त्यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. “८४ व्या वर्षीही शरद पवार जिद्दीने लढत आहेत. त्यांचा एक उज्ज्वल कार्यकाळ आहे. त्यांच्या करिअर ड्राफ्टवर बोलायला मी खूप लहान आहे”, असे सुळे यांनी म्हटले आहे.
दादा ६५ वर्षांचे आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना ‘बच्चा’ म्हटले होते. “तो अजून इतका मोठा झाला नाही, रोहित पवार अजून बच्चा आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजितदादांच्या वयाच्या मानाने रोहित पवार अजून बच्चा आहेच. कारण अजितदादाच आता सिनिअर सिटिझन आहेत. दादा ६५ वर्षांचे आहेत. ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठे आहेत. संविधानात वयाची अट नाही. त्यामुळे अजितदादांनी कधी निवृत्ती घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. अजितदादा हे काकाच्या अधिकाराने रोहित पवार यांना बच्चा म्हणाले. त्यामुळे तो अधिकार त्यांना आहे. पण रोहितच्या वयात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.”
मी यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीत वाढलेली कार्यकर्ता
दरम्यान, अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर आक्रमकपणे टीका होत असताना त्याला प्रत्युत्तर दिले जात नाही, त्यामुळे पवार कुटुंब एकत्र असल्यासारखं वाटतं, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर “मी राजकारणात आरेला कारे करायला आले नाही. मी यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीत वाढलेली एक कार्यकर्ता आहे. आरेला कारे म्हणणे कधीकधी सोपं असतं पण शांत बसून सहन करायला जास्त ताकद लागते”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.” काम करण्याच्या शैलीबाबत मीही १६ तास काम करते तसेच पारदर्शक काम करते, असे देखील त्या म्हणाल्या.
Web Title: Supriya sules counter attack on ajit pawar they said ajit dada is now a senior citizen read detailed report nryb