उद्योजक गौतम अदाणी हे माझ्यासाठी केवळ उद्योगपती नाहीत, तर भावाप्रमाणे आहेत. कधी ते भाऊ म्हणून रागावतात, तर कधी प्रेमाने कौतुकही करतात, असे भावनिक उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कृतीशील विचारांचा वारसा सांगणारी आहे.
राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अभिवादनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ते कामात व्यस्त असतील, याबाबत माहिती नाही.
भाजपावर टीका होत असतानाही गंगणे यांच्या नावाला पक्षाकडून देण्यात आलेली पसंती भुवया उंचवायला लावणारी आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप वारंवार होत आहे.
Supriya Sule on Varsha Bunglow: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पुणे शहरातील तसेच कोथरुडमधील अनेक मुद्द्यावर नवराष्ट्रसोबत संवाद साधला.
बारामती तालुक्यातील अनेक महारवाटनाच्या जमिनी बेकायदा शासनाच्या नावावर करून त्या इतर कामासाठी हस्तांतरित करण्यास भाग पाडून बौद्ध समाजाला भूमिहीन करण्यास भाग पाडल्याचे चौधरी यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्ष अनिता पवार यांनी पुणे शहरातील अनेक मुद्द्यावर नवराष्ट्रसोबत संवाद साधला.
पिंपरी-चिंचवड परिसरात एका महिलेला सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण झालेली महिला देखील त्याच पक्षाची पदाधिकारी आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जात भेट घेतली आहे. यानंतर पुण्यामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर असताना सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नसल्याचेसांगितले. परतत असताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली.
मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचे पाणी आणि ढिगाऱ्यामुळे अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळेचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून विरोधकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त करत कोकाटे यांचे…
सध्या युगेंद्र पवार हे शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय, विद्या प्रतिष्ठान या नामवंत शैक्षणिक संस्थेचे खजिनदार म्हणूनही त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी आहे.
आपण सगळ्यांनी कानाकोपऱ्यात काम केले पाहिजे. पक्ष पूर्ण ताकदीने सामाजिक प्रश्नांसाठी काम करेल. ताकदीने लोकांसाठी काम करणार. केवळ सत्तेत जायचे हे लक्ष असता कामा नये, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
१२ विद्यार्थ्यांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थ्यांची आज एमपीएससीची परीक्षा असल्याचे समोर येत आहे.
महाविकास आघाडीसोबत राहणे त्यांना पचनी पडणारे नाही आणि ते राहणारही नाहीत. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून दिसतील, असा दावा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.