Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. तसेच पुढच्या महिन्याभरात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2026 | 08:39 AM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आला आहे. मात्र, या दोन्ही पक्षाचे विलिनीकरण लांबण्याची शक्यता आहे. असे असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. ‘जर आज अजित पवार जिवंत असते तर पक्षातील दोन्ही गट विलीन झाले असते. अजित पवारांनी १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत १२ फेब्रुवारी ही दोन्ही गटांच्या विलीनकरणाची तारीख निश्चित केली होती’, असे खासदार सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचे कुटुंब खूप कठीण काळातून जात आहे. आम्ही एकमेकांना पाठिंबा देऊन पुढे जात आहोत. आज दादा (अजित पवार) आपल्यात नाहीत, त्यामुळे मला जुन्या गोष्टी उलगडायच्या नाहीत. माझ्या आणि दादामध्ये जे काही घडले ते आपल्यात आहे. आता दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. तसेच पुढच्या महिन्याभरात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, अजित पवार यांचा अपघात की घातपात या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत, तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात

रोहित पवार यांची चिंता स्वाभाविक आहे. अनेक प्रश्न आहेत, पण त्यांची उत्तरे मिळत नाहीत. विमान अपघात कसा झाला? त्याला कोण जबाबदार आहे? आपण अजित पवारांना वाचवू शकलो असतो का? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, आम्ही त्या चौकशीची वाट पाहत आहोत.

कन्या रेवतीच्या लग्नाबाबतही विधान…

सुप्रिया सुळे यांनी त्यांची मुलगी रेवती सुळे आणि नागपूरचे व्यापारी सारंग लखानी यांच्या लग्नाची पुष्टी झाली आहे. नातेसंबंध निश्चित झाले तेव्हा अजित पवार जिवंत होते. आम्ही सर्वजण ३० जानेवारी रोजी त्याची घोषणा करणार होतो, पण त्यापूर्वी २८ जानेवारी रोजी अजितदादांचे निधन झाले. हे नाते निश्चित करण्यात अजित पवार यांनी मोठी भूमिका बजावली. मी यावर समाधानी आहे.

हेदेखील वाचा : Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट जोडले हात

Web Title: If ajitdada was there the merger would have been successful says mp supriya sule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • NCP Politics
  • political news
  • supriya sule

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक
2

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
3

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
4

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.