sushma andhare
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत होते. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या, प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare To Enter In Shivsena) यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पक्षात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना उपनेतेपद देण्यात आलं आहे. प्रवेशावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.
प्रवेश करण्यापूर्वी त्या म्हणाल्या होत्या की, हा प्रवेश मला काय देणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता काय द्यायचं आणि काय घ्यायचं? हा मुद्दाच नाही. शिवसेनेकडून आता काही अपेक्षाही नाहीत. माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की, मी शिवसेनेला काय देऊ शकते. मी काय करु शकते? चांद्यापासून बांद्यापर्यंत जो शिवसैनिक भरकटला आहे. या शिवसैनिकांमध्ये मी कशी एक नवी उमेद जागी करु शकते, हे महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी दिली.