Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकच देत आहेत अंधश्रद्धेचे धडे ! धोंडी मागण्यासाठी गावभर फिरविणाऱ्या शिक्षकावर कारवाईची मागणी

धोंडी मागून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा उपक्रम ( An initiative to fertilize superstition) विद्यार्थ्यांना सोबत घेवून बनारसे नावाच्या जि. प. शिक्षकाने केला. सदर उपक्रमाची प्रसिध्दीही देण्यात आली आहे. सदर उपक्रमातून अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याने शिक्षकाच्या सेवाशर्ती नियमांचा भंग हा आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 10, 2022 | 05:02 PM
Teachers are giving lessons of superstition! Demand for action against a teacher who wandered around the village to demand stones

Teachers are giving lessons of superstition! Demand for action against a teacher who wandered around the village to demand stones

Follow Us
Close
Follow Us:

वाशीम : कारंजा तालुक्यातील (Karanja taluka) मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारसे (Banarase, a primary school teacher in Masala) यांनी मुलांकडून धोंडी मागून घेवून वरुणराजाला साकडे घातले. हे कृत्य करीत असताना मुलांच्या अंगातील कपडे काढून, त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला गावभर फिरविणे आणि अस्तित्वात नसलेल्या भ्रामक कपोल कल्पित गोष्टीचा प्रसार करीत पाण्यासाठी धोंडी मागण्याचे आणि असे गावात फिरल्याने पाणी येते, अशी अविवेकी अंधश्रद्धा आणि तस्संम बाबीला खतपाणी घालणारी नुकतीच घटना कारंजा तालुक्यातील मसला येथे घडली असून सदर घटनेबाबत विविधस्तरावर त्याच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या, सबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन निलंबित करा, अशी मागणीही करण्यात आली असल्याने जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी गांभीरतेने या प्रश्नावर लक्ष देत संबधित बनारसे नामक शिक्षकास आपणास निलंबित का करू नये, या बाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

धोंडी मागून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा ऊपक्रम ( An initiative to fertilize superstition) विद्यार्थ्यांना सोबत घेवून बनारसे नावाच्या जि.प.शिक्षकाने केला. सदर ऊपक्रमाची प्रसिध्दीही देण्यात आली आहे. सदर ऊपक्रमातून अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याने शिक्षकाच्या सेवाशर्ती नियमांचे भंग आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानवाद शिकवायचे सोडून अंधश्रध्दा जोपासणार्‍या असे कृत्य करवून घेतल्यामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत असून सदर शिक्षकाने कर्तव्यात नेमून दिलेल्या कर्तव्याचा भंग केल्यामुळे त्वरीत निलंबित करावे, अशा विविध सामाजिक संघटना, अंनिस, आणि इतर शिक्षकामधूनही प्रतिक्रिया सोशल मीडियावर ऊमटल्या आहेत. सदर उपक्रमातून मुलांना बालपणापासूनच अंधश्रध्देच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न असून सबंधितावर अंधश्रध्दा निमूर्लन कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशीही मागणी जोर धरत आहे.

धोंडी प्रकरणाची वरिष्ठ प्रशासकिय स्तरातून त्वरीत दखल घेवून शिक्षणाधिकारी यांच्या आदेशावरुन कारंजाचे गटशिक्षणाधिकारी यांनी सबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पुढे शिक्षण विभाग काय कारवाई करते ? याकडे लक्ष लागले आहे. सबंधित शाळेवरील जे शिक्षक या धोंडी प्रकरणात सहभागी किंवा ऊपस्थीत नव्हते त्यांनाही कारणे दाखवा नोटीस शिक्षण विभागाकडुन पाठवली असल्याने ज्यांनी धोंडी ऊपक्रमात सहभाग नोंदवला अशा जबाबदार शिक्षक आणि त्यांना पाठिशी घालणार्‍या यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Teachers are giving lessons of superstition demand for action against a teacher who wandered around the village to demand stones nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 05:01 PM

Topics:  

  • vashim news

संबंधित बातम्या

वाशीम हादरलं! किरकोळ वाद अन् जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या
1

वाशीम हादरलं! किरकोळ वाद अन् जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.