
₹600 Crore Scam in Thane Municipal Corporation; MLA Sanjay Kelkar Demands High-Level Inquiry
Thane Municipal Corporation: गेल्या १० वर्षात सुमारे ६०० कोटींची वसुलीपात्र रक्कम वसूल करण्यात आली नसून बड्या विकासकांना मोकाट सोडण्यात आले आहे. महापालिकेला देण्यात आलेल्या दहा हजार कोटींचा निधी वापरताना अनियमितता झाली आहे तर महापालिकेच्या सुमारे १५ हजार कोटींच्या स्थावर मालमत्ता असून ठराविक व्यक्ती आणि संस्थांना नाममात्र एक रुपया भाड्याने देऊन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी करत ठाणे महापालिकेच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. एकत्रित प्रस्तावावर विधानसभेत चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत गेल्या दहा वर्षांत झालेला भ्रष्टाचार आकडेवारीनिशी उघडकीस आणत महापालिकेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
ठाणे महानगरपालिकेची १५ हजार कोटींची मालमत्ता
ठाणे महापालिकेची शहरात सुमारे १५ हजार कोटींच्या मालमत्ता असून काही ठराविक व्यक्तींना आणि संस्थांना नाममात्र वार्षिक एक रुपया भाड्याने त्या देण्यात आल्या आहेत. या मालमत्ता महापालिकेच्या उत्पन्नाचे एक महत्वाचे स्रोत असताना त्याचा वापर तिसऱ्याच व्यक्ती करत असून लाखो रुपये कमवत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी करून या विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.
परिवहनसेवेसाठी शासनाकडे ३६४ कोटींची मागणी
अनेकवेळा मागणीनंतर तीन वर्षांचे ऑडिट करण्यात आले, परंतु ते अपूर्ण असल्याचा आरोप श्री. केळकर यांनी केला.
एकीकडे विकास कामे करण्यासाठी तिजोरीत पैसे नसल्याचे सांगून महापालिकेने परिवहन सेवेसाठी शासनाकडे ३६४ कोटींची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मात्र तब्बल ६०० कोटी रुपये वसुलीपात्र रक्कम वसूल न करता बड्या
विकासकांना मोकाट सोडले आहे. बिटकॉन इंडिया एक कोटी ४० लाख, तांत्रिक सल्लागाराला ज्यादा देण्यात आलेले एक कोटी ८७ लाख आणि मोबाईल टॉवर कंपन्यांकडून थकीत २४ कोटी अशा रकमांचा उल्लेखही श्री. केळकर यांनी केला.
मालमत्ता कर