ठाणे महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती.
खड्ड्यांमुळे सतत होणारे अपघात आणि त्यासाठी जबाबदार अधिकारी टाळाटाळ पाहून न्यायालयाने हस्तक्षेप केला. प्रत्येक नगरपालिकेत विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली. यामुळे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपनेच जाळे टाकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली.
कोरोना काळात असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपले काम केले, त्यांना आता ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आढावा बैठक घेतली, ज्यात त्यांनी थेट सांगितले की अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ठाणे महापालिकेतील सेवा निवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच दिवंगत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं घडलं काय? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
पावसाळ्यात मुंबई आणि तिच्या लगतच्या जिल्ह्याना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे ठिकठिकाणी पाणी भरणे. हीच समस्या टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
ठाणे शहरातील मैदान खेळण्यासाठी कमी आणि पार्किग-प्रदर्शनासाठी जास्त वापरले जात असल्यामुळे संगम डोंगरे यांनी ठाणे पालिकेच्या मुख्यालयात क्रिकेट खेळत निषेध नोंदवला आहे.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार, पाणी ग्राहकांकडून सन २०२४-२५च्या चालू वर्षाच्या बिलांपोटी १४७ कोटी रुपये तर थकबाकीपोटी ७८ कोटी रुपये असे एकूण २२५ कोटी रुपये वसूल करायचे होते.