फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांचा प्रचाराचा धडाका मतदारसंघात सुरूच असल्याचे दिसत आहे. अतिशय नियोजनबध्द पद्धतीने विश्वनाथ भोईर हे प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक विभागात आणि प्रत्येक वॉर्डांतील मतदारांशी संपर्क साधताना दिसत आहेत. मंगळवारी विश्वनाथ आत्माराम भोईर यांची प्रचार रॅलीची निक्की नगर येथून सुरू होऊन अग्रवाल महाविद्यालय, भंडारी आळी, कारभारी नगर, पवन धाम, कस्तुरी पार्क, तुलसी पूजा, तारांगण, नीळकंठ पार्क, रिटा स्कूल, रविकांत वायले चौक, पोद्दार शाळा, गोकुळ नगरी, अग्रवाल चौक, श्वास हॉस्पीटल, महावीर हाईटस्, महावीर नगरी टॉवर, राधा नगर, कैलास पार्क, मंगला पार्क, अभिषेक अभिनंदन, साई चौक, साई बाबा मंदिर, वाणी शाळा, रवी पाटील बंगला, आरटीओ, बिर्ला शाळा, बिर्ला कॉलेज, मिलिंद नगर, भोईटे दवाखाना, दत्तात्रय कॉलनी, अशोक भोईर शाखा, ब्रायटन शाळा, गुरू आत्मन, योगिधम, घोलप नगरमार्गे गणपती चौक येथे समाप्त झाली.
या प्रचार रॅलीमध्ये शिवसेना, भाजप राष्ट्रवादी रिपाई आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या 20 तारखेला आम्ही धनुष्यबाण चिन्हाशी बांधिल राहत विकासाचं बटण दाबू असा विश्वास ही यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. प्रचार रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद पाहत विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे , महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, महिला उपजिल्हा संघटक नितु कोटक, मा. नगरसेवक जयवंत भोईर, अर्जुन भोईर, मा.नगरसेविका वैशाली भोईर, शालिनी वायले, पुष्पा भोईर, विभाग प्रमुख रुपेश सकपाळ, अंकुश केणे, अनघा देवळेकर, मंगला वाघ, अंजली भोईर, नितीन जाधव, रावसाहेब आहेर, अशोक भोईर, भावेश अवसरे, प्रतीक चौधरी, साधना गायकर, योगेश पाटील, अनिरुद्ध पाटील, राजू राम, रवी गायकर, संजय कारभारी, शत्रुघ्न भोईर, दीपक भंडारी, स्वाती पाटील तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांची लढत ही शिवसेना ठाकरे गटाचे सचिन बासरे आणि मनसेचे उल्हास भोईर यांच्याविरुद्ध होणार आहे. या मतदारसंघात 2009 मध्ये मनसे विजयी झाली होती तर 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला होता. 2019 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेकडून विश्वनाथ भोईर विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महायुतीचे पारडे जड असले तरीही विधानसभेसाठीची समीकरण वेगळी असतात त्यामुळे चुरशीची लढत या ठिकाणी होऊ शकते.