Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : एसीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांना काय कळणार ? खड्डयांमुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांचा संताप

पावसाळा सुरू होताच कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास वाहन चालकांना आणि रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरीकांना होत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे रिक्षा चालक आणि प्रवासी याचे कंबरडे मोडले

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 12, 2025 | 04:29 PM
Thane News : एसीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांना काय कळणार ? खड्डयांमुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांचा संताप
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली :  पावसामुळे  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिकांना अनेक आव्हानांना सामोरं जाव लागत आहे. पावसाळा सुरू होताच कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास वाहन चालकांना आणि रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरीकांना होत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे रिक्षा चालक आणि प्रवासी याचे कंबरडे मोडले आहे. डोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोड नवापाडा परिसरात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत.

मात्र पालिकेचं या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने  दररोजचा त्रास कमी करण्यासाठी रिक्षा चालक संतोष मिरकुटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. खड्यांमधून प्रवास करताना चालक अक्षर: जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या सगळ्यावर नागरिकांनी पालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेती अधिकारी फक्त एसीमध्ये बसून प्रतिक्रिया देतात की, खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. अधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्यावर येऊन बघावे काय परिस्थिती आहे ? असा संतप्त सवाल रिक्षा चालक मिरकुटे यांनी उपस्थित केला आहे.

Thane News : शहरात विकासकांची मनमानी; रस्त्यांवर चिखल, वाहनचालक हैराण; काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

रिक्षा चालक मिरकुटे यांनी सांगितले की, रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रवासी आणि आम्हा रिक्षा चालकाना कमरेचा त्रास होतो. प्रशासनाने खड्डे भरलेले नाही. त्यामुळे मी स्वत: खड्डे भरले. प्रशासन कमी पडते. तिथे नागरीकांनी पुडाकार घेऊन अशा गोष्टी करायला पाहिजेत. तुम्हाला इथे खड्डे दिसता. प्रशासनाचे अधिकारी एसीमध्ये बसतात. एसीत बसून रस्ते झालेले आहेत. करायला पाहिजेत अशा बाता करतात. स्वत: रस्त्यावर येऊन गाडी चालवून बघा. नागरीक महापालिकेचा कर भरतात. आम्ही रिक्षा वाले सुद्धा दरवर्षी रिक्षा पासिंग करतो. तो कर सरकारच्या तिजोरीतच जमा होतो.

Navi Mumbai: बदलीचे ठिकाण नावडते म्हणून वाद! पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची चालढकल

आम्हाला सुविधांच्या रुपात काही मिळत नाही. रस्त्यावरील खड्डयांमुळे कमरेचा त्रास मिळतो. रिक्षावाले मुजोर नसतात. रिक्षावालेही चांगले काम करणारे आणि प्रामाणिक असतात. एखादी घटना घडली तर रिक्षावाले मुजोर असा शब्द नका वापरू. महापालिकेस विनंती आहे. डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड ते नवा पाडा हा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे का परिस्थिती आहे ? ये येऊन बघा. माझी कळकळीची विनंती आहे. या रस्त्यावरील खड्डे स्वत: आयुक्तांनी येऊन पाहावेत. तेव्हा त्यांना कळेल रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे.

Web Title: What will the municipal officials who sit in ac know rickshaw drivers and passengers are angry due to potholes in dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 04:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.