Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेदरकार चालकानं चौघांना उडवलं ; दोन बँक अधिकाऱ्यांसह पादचारी जखमी, पोलिसाचा मृत्यू

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 13, 2022 | 08:11 AM
बेदरकार चालकानं चौघांना उडवलं ; दोन बँक अधिकाऱ्यांसह पादचारी जखमी, पोलिसाचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या २८ वर्षीय चालकाला मुंबईतील कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. या चालकाने आणखी तीन जणांना उडवलं (The careless driver blew up four person) असून यामध्ये दोन बँक अधिकारी आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) नितेश कुमार मंडल (वय 43 वर्षे) आणि एसबीआय कॅपिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष सुजय कुमार विश्वास (वय 35 वर्षे) यांचा समावेश आहे.

दक्षिण मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाहेर मंगळवारी (12 एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. 28 वर्षीय तरुणाने बेदरकारपणे गाडी चालवत तीन ते चार जणांना उडवलं. मुकेश प्रदीप सिंह असं आरोपी चालकाचं नाव असून त्याला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 1.50 च्या सुमारास ही घटना घडली. मुकेश प्रदीप सिंहने त्याच्या मालकाला मॉरिस गॅरेज (MG) इलेक्ट्रिक SUV मधील नरिमन पॉईंटच्या मेकर चेंबरमध्ये सोडलं आणि त्याच्या मालकाला न कळवता नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होता. जुहूमधील रहिवासी असलेल्या मुकेश सिंह सोमवारी रात्री दारु प्यायला होता आणि घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असा प्राथमिक अंदाज आहे.

“कफ परेड भागातील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळून जात असताना, गेट क्रमांक 4 आणि 6 नजिक पोहोचल्यावर मुकेश सिंहचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जेवणाच्या सुट्टीच्या वेळी बाहेर पडलेल्या लोकांवर जाऊन धडकली. सुरुवातीला मुकेश सिंहने बँक अधिकारी आणि एक पादचारी आसिफ शेख आणि नंतर थांबलेल्या टॅक्सीला धडक दिली. या धडकेमुळे, टॅक्सी पुढे सरकली आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात लिपिक असणारे प्रसेनजीत गौतम धाडसे (वय 36 वर्षे) यांच्यावर जाऊन आदळली आणि ते एका सिमेंट ब्लॉकवर आदळले,” अशी माहिती कफ परेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांनी दिली.

Web Title: The careless driver blew up four pedestrian injured along with two bank officers police died nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2022 | 08:05 AM

Topics:  

  • Mumbai accident

संबंधित बातम्या

Mumbai Accident : मुंबईतील गोवंडीत डंपरने तिघांना चिरडलं; घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर दुर्घटना
1

Mumbai Accident : मुंबईतील गोवंडीत डंपरने तिघांना चिरडलं; घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर दुर्घटना

Mumbai Accident: ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात
2

Mumbai Accident: ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात

हायड्राक्रेनच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना
3

हायड्राक्रेनच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.