Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांची चिंता वाढली; झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या ७ वर

काही दिवसांपूर्वी पुण्यात २ गर्भवती महिलांसह ६ जणांना झिका व्हायरची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता पुण्यातील झिका व्हायरच्या रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2024 | 09:10 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी पुण्यात २ गर्भवती महिलांसह ६ जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता हा आकडा ७ वर गेला आहे. आतापर्यंत पुण्यातील ७ जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून पुण्यात आरोग्य सर्वेक्षण सुरु झालं आहे. झिका व्हायरचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं गर्भवती महिलांच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला आहे.

पुण्यातील आरोग्य विभागानं आतापर्यंत सुमारे ४१ गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवले आहेत. एरंडवणे परिसरातील १४, मुंढवा परिसरातील १८ आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील ९ गर्भवतींचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत. गर्भवती महिलांसह आरोग्य विभागाने एकूण ६४ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवविले आहेत. यापैकी २५ जणांचा अहवाल आरोग्य विभागाला मिळाला आहे. तर इतर अहवालांसाठी आरोग्य विभाग प्रतिक्षा करत आहे.

पुण्यात झिका व्हायरच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असून पुण्यात सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणावेळी शहरातील २४६ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. आरोग्य विभागाने याप्रकरणी ८२ जणांना नोटीस बजावली आहे. तसेच ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुण्यातील झिका व्हायरसचा पहिला रुग्ण एरंडवणे परिसरात आढळला. एरंडवणे परिसरात एका ४६ वर्षीय डॉक्टरला झिका व्हायरसचा संसर्ग झाला होता. डॉक्टरच्या १५ वर्षीय मुलीलाही झिकाची लागण झाली होती. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात झिका व्हायरसचे २ रुग्ण आढळले होते.एरंडवणे परिसरात एकूण ७२ गर्भवती महिला आहेत. मुंढवा परिसरात ६० गर्भवती महिला आहेत. झिका व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत आरोग्य विभागाने एरंडवणे परिसरातील १४, मुंढवा परिसरातील १८ आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील ९ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत.

झिका व्हायरसची लक्षणे

  • सौम्य ताप
  • शरीरावर पुरळ उठणे
  • डोळ्यात लालसरपणा
  • स्नायू आणि सांधेदुखी
  • डोकेदुखी

Web Title: The concern of pune residents has increased zika virus cases rise to 7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 09:10 AM

Topics:  

  • Pune
  • Zika virus

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
3

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.