देशभरात आज हजारो बालके कुपोषणाची शिकार होत असताना, सर्वसामान्य जनतेवर कराचा बोजा वाढला असताना, महागाईचा भडका उडाला असताना संसद आणि विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी राज्याच्या तिजोरीवरच डल्ला मारण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबईत संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिदेच्या समारोपवेळी शाही भोजनाचाही बेत करण्यात आला होता. पण या शाही भोजनासाठी प्रत्येक आमदार आणि प्रत्येक खासदारावर तब्बल चार हजार पाचशे रुपयांचा खर्च कऱण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे चांदीच्या एका ताटाचे भाडे ५५० रुपये होते. तर जेवणाचा खर्च चार हजार रुपये इतके होते. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर आधीच भार असताना दुसरीकडे लोकप्रतिनीधींच्या जेवणावर एवढा खर्च करणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Axiom-4 mission Launch : शुभांशूची अवकाश भरारी ; अॅक्सिओम-4 अंतराळात झेपावले
संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समितीचीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा काल समारोप कऱण्यात आला. या समारोपाच्या वेळी करण्यात आलेल्या शाही भोजनासाठी एका आमदार किंवा खासदावर एक दोन नव्हे तर तब्बल ४५०० रुपये प्रत्येकी असा खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आमदार-खासदारांच्या फक्त एका वेळच्या जेवणासाठी राज्याच्या तिजोरीतील निधीचीच उधळपट्टी सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे.
मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या परिषदेत आमदार खासदार यांच्यासाठी चांदीच्या ताटांत भोजन वाढण्यात आले. या भोजनात विविध पंचपक्वान्नांचा समावेश होता. विशेष म्हणजे, चांदीच्या एका ताटाचे भाडेच दिवसाला ५५० रुपये होते, तर प्रत्येक व्यक्तीच्या जेवणावर सुमारे ४,००० रुपये खर्च आला. यानुसार, एका व्यक्तीमागे एकूण ४,५०० रुपयांचा खर्च करण्यात आला.
अर्थसंकल्पातील तरतुदींची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काटकसर करण्याच्या शिफारसी करणे ही जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते, त्याच समितीच्या सदस्यांसाठी चांदीच्या ताटात भोजन देऊन सार्वजनिक निधीची उधळपट्टी करण्यात आल्यामुळे आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका बाजूला सर्वसामान्य जनतेवर आर्थिक बोजा वाढत असताना, दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींच्या जेवणावर इतका मोठा खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल या प्रकरणातून पुढे येत आहे.
‘मी खूप आनंदी आहे…’, ‘Sitaare Zameen Par’ चे यश पाहून आमिर खान खुश; चाहत्यांचे मानले आभार
ताटासह चमचे, वाट्या, ग्लास सगळं काही चांदीचं होतं. चांदीच्या ताटात जेवणाचा मेन्यूही तितका खास होता. त्यात कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दहीवडे, बटाट्याची भाजी, पुरण पोळी इ. पदार्थांचा समावेश होता. महत्त्वाची बाब म्हणजे, या परिषदेत एकूण ६०० अंदाज समिती सदस्य सहभागी झाले होते. त्यामध्ये अध्यक्ष, सदस्य मिळून २५० खास अतिथी आणि २५० अधिकारी उपस्थित होते. विधीमंडळाबाहेर स्वागतासाठी ४० फूट उंच फलकांच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. राहण्याची व्यवस्था ‘ताज पॅलेस’ आणि ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलांमध्ये करण्यात आली होती.
विधीमंडळ परिसरात मलमली कापडाचे वातानुकूलित शामियाने उभारले गेले होते, ज्यामध्ये भव्य झुंबरही लावण्यात आले होते. याशिवाय, हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, प्रवासासाठी खास वाहनांची सोय आणि मुंबई दर्शनाची सहलीचेही नियोजन करण्यात आले होते. एकीकडे अंदाज समितीकडून सरकारला काटकसर करण्याच्या शिफारसी अपेक्षित असताना, या परिषदेत मोठ्या प्रमाणात खर्च आणि देखावेबाजी झाल्याने राज्य विधीमंडळाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.