Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा…”; आमदार पाटलांची विधानसभेत महत्वाची मागणी

मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 18, 2024 | 05:46 PM
"जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा..."; आमदार पाटलांची विधानसभेत महत्वाची मागणी

"जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा..."; आमदार पाटलांची विधानसभेत महत्वाची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर: माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये , मागील ३०वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर न राखण्यासाठीच आमदार पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्ठीने तयारी ठेवली आहे. माढा पंढरपूर विधानसभा मतदार संघातून विकासाचे व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी पाठविण्याचे काम विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केले आहे. त्यामुळेच आमदार अभिजीत पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूरपणे आपल्या मतदार संघातील विकासासह राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, महादेव कोळी, मुस्लिम या विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे.

हेही वाचा: मनोज जरांगे पाटील पुन्हा ॲक्शनमोडवर! नवीन वर्षातील आमरण उपोषणाची थेट तारीख केली जाहीर

आगामी २५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. परंतु या आंदोलनाच्या इशाराकडे सरकारने गांभीर्याने पहिले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आमदार  अभिजीत पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. यामुळेच सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचे काम खुद्द अभिजीत पाटील यांनी केले आहे. यामुळेच मराठा समाजाला दिलेल्या शब्द पाळण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरु झाला असल्याचे स्पष्ट दिसले आहे.

माढा मतदार संघातील माढा शहरमध्ये दहा दिवसातून पाणी मिळते. याबाबत उजनी धरण या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का? असा प्रश्न मांडत हा पाणी प्रश्न सोंडविण्याबाबत मागणी केली आहे. सरकारने शहरा बरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलली पाहिजे. याकरिता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडनिंब येथील  एमआयडीसीला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असेही सांगितले. यासह विविध प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी आवाज उठवीत आपण माढा मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेवून जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे.

एम एस पी वाढविण्यासाठी पाठपुरावा व्हावा

आपल्या महाराष्ट्र राज्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. याच उद्योगावर राज्यातील मोठं आर्थिक गणित अवलंबून आहे. यासाठी हा साखर उद्योग चालविणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांना लाभ होण्यासाठी साखरेचे भाव वाढविणे आवश्यक आहेत. तरच उसाला भाव वाढ देणे शक्य असते. यासाठी आपल्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारला एम एस पी वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याची मागणी माढाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.

Web Title: The issue of reservation should be resolved by conducting a caste wise census mla abhijeet patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 05:45 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • Reservation News

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.