रिक्षाचालकाने एक लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज प्रामाणिकपणे केला परत
कल्याण : कल्याण (Kalyan) येथील व्यापारी राजेश शहा (Businessmen Rajesh Shah) ठाणे शहरात (Thane) कामानिमित्त रिक्षात (Rickshaw) प्रवास करत असताना त्यांचे एक लाख तीस हजार रुपये (1 Lakhs Thirty Thousand Rupees) किमतीचे ॲप्पल कंपनीचे आयपॅड रिक्षात विसरले (Apple Company iPad Ferget In Rickshaw).
रिक्षा संघटनेची मदत होईल या हेतूने त्यांनी प्रतिक पेणकर (Pratik Penkar) यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे पदाधिकारी जितेद्र पवार (Jitendra Pawar, office bearer of Konkan Division Rickshaw Taxi Federation) यांचे माध्यमातून ठाणे शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून रिक्षात आयपॅड विसरल्याची माहिती दिली.
[read_also content=”त्या आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभ्या होत्या, एकीच्या वडिलांनी हटकले, दोघींचीही सटकली; अल्पवयीन असल्याने रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल, अन्… https://www.navarashtra.com/crime/crime-news-two-minor-girls-suicide-by-hanging-in-kurze-kompada-talasari-palghar-one-of-the-father-refused-nrvb-384605.html”]
विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी युनियन ठाणे पदाधिकारी ऋषिकेश पाटील यांनी रिक्षा चालकास शोधण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. रिक्षाचालक इस्माईल सोनाजी ताबोंळी ठाणे रिक्षा MH04 FC 1095 यांचे रिक्षात विसरलेला किमती आयपॅड राजेश शहा यांना प्रामाणिक पणे परत केला. रिक्षा चालक इस्माईल ताबोंळी यांचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले असून विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी युनियन ठाणे पदाधिकारी ऋषिकेश पाटील यांचे देखील प्रवासी राजेश शहा यांनी आभार मानले आहेत.