BMC Elections: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय समाजाने एकजुटीने मतदान केल्यास, मुंबईत उत्तर भारतीय नागरिक महापौर होऊ शकतो, असा दावा उत्तर भारतीय विकास सेनेचे नेते सुनील शुक्ला यांनी केला आहे. शुक्ला यांनी यासंदर्भातील आकडेवारी मांडली आहे. पण त्यांच्या या दाव्यानंतर मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा उत्तर भारतीयांविरोधात असंतोष वाढण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याबाबत बोलताना शुक्ला म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेचे अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या सुमारे २ कोटी २० लाख आहे. त्यापैकी १ कोटी उत्तर भारतीय, १ कोटी मराठी आणि उर्वरित २० लाख इतर समाजाचे नागरिक आहेत.
मुंबईतील मराठी मतदार वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विभागलेले आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, भाजप आणि काँग्रेस, या पाच पक्षांमध्ये मराठी समाजाची मते सुमारे २०-२० टक्क्यांमध्ये विभागली जाऊ शकतात. पण जर उत्तर भारतीय समाजाने जर एकगठ्ठा मतदान उत्तर भारतीय उमेदवाराला केलं, तर मुंबई महापौरपद त्यांच्या हातात येऊ शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, वाचा तुमच्या शहरातील किंमती
सुनील शुक्ला म्हणाले, आज उत्तर भारतीय मुंबईत वंचित आहे, पीडित आहेत. उत्तर भारतीयांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील उत्तर भारतीयांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. एक कोटी उत्तर भारतीयांमध्ये10 पैकी केवळ तीन उत्तर भारतीयांनी जरी मतदान केलं तरी 30 लाख मतदान होते आणि या 3 टक्के मतदानामुळेच मुंबईत उत्तर भारतीय विकास सेनेचा महापौर होणे शक्य आहे. त्यामुळे उत्तर भारतीय विकास सेना हा पर्याय तुमच्यासमोर आहे.
मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय महापौर घडवण्याची हीच वेळ आहे. तसेच, आपण स्वतः कुठलीही निवडणूक लढवणार नाहीत, मात्र मुंबईतील 227 पैकी प्रत्येक प्रभागात उत्तर भारतीय उमेदवार उभे करणार असल्याचेही शुकला यांनी म्हटलं आहे. तसेच, “तुमच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल आणि मुंबईतून बाहेर जायचे नसेल, तर उत्तर भारतीय विकास सेनेला मतदान करा. हीच वेळ आहे उत्तर भारतीय महापौर बनवण्याची.” असं आवाहनही त्यांनी केल आहे.
मुंबई उत्तर भारतीयांचे राजकीय गणित त्यांनी मांडले. मराठी समाजाची मतं उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, भाजप आणि काँग्रेस अशा पाच पक्षांमध्ये विभागली जातील. त्यामुळे प्रत्येक पक्षाला सरासरी २० टक्के मतं मिळाल्यासही त्यांचा महापौर होणार नाही, असं त्यांनी म्हटलं. याच्या उलट, जर उत्तर भारतीय विकास सेनेला केवळ ३० टक्के मतं मिळाली. म्हणजे १० पैकी फक्त ३ मतं — तरीही उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो, असा विश्वासही शुक्ला यांनी व्यक्त केला. “मुंबईचा महापौर आपलाच असेल. आपण ही निवडणूक जिंकू,” असं ठाम वक्तव्य करत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारीचे संकेत दिले आहेत.