राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; अकोल्यात ढगफुटीसदृश पावसाने जनजीवन विस्कळीत
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हेदेखील वाचा : Sindhudurg News : “पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”; परशुराम उपरकरांचा खोचक टोला
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत होते. असे असताना तीनच दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईतील कांदिवली, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली.
विदर्भाला पावसाने झोडपले
विदर्भ जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. मात्र, पश्चिम विदर्भात नागरिक पावसाची प्रतीक्षा करत आहेत. धरण साठ्यात ४८ टक्के पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे, कोल्हापुरात पावसाचं जोरदार आगमन झालं आहे.
अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Jitendra Awhad : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल