मुंबई: राज्यात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढणार आहे, कारण लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. ज्यांची आर्थिक स्थिती तुलनेने चांगली आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे. या बदलामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि सरकारची आर्थिक तूट टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे बोलले जात आहे. पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती, मात्र ही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे.विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका करताना, या योजनेमुळे तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने ती बंद केली जाईल, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र, अजित पवार यांनी स्पष्ट केलं की सरकार ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार करत नाही आणि राज्यातील महिलांनी चिंता करण्याची गरज नाही. केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच लाभ देण्याचा विचार सरकार करत आहे, त्यामुळे काही पात्रतेच्या अटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पण योजना सुरूच राहणार असल्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
MLC Election : विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध, ६ पैकी ५ उमेदवारांचे अर्ज वैध
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, मात्र योजनेच्या निकषांमध्ये बदल केले जातील. अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार, फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती तुलनेत चांगली आहे, त्या आता योजनेतून वगळल्या जातील.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना घाईघाईत सुरू केली होती, असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच, निवडणूक प्रचारावेळी महायुतीने योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. निकषांमध्ये बदल झाल्यास, लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. यावर लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
Nagpur Violence : राज्यात अशांतता निर्माण करु नका…; दंगलीनंतर छगन भुजबळ यांचे सर्व पक्षांना आवाहन
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेतील हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.महायुती सरकारने योजनेचा आढावा घेऊन अपात्र लाभार्थींना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपात्र ठरलेल्या महिलांना मोठा दिलासा दिला आहे. जे महिला अपात्र ठरतील, त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही. महायुती सरकारने 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन दिले असले तरी, यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे महिलांना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.