Three years rigorous imprisonment for the accused in the case of molesting the minor daughter of a friend
वर्धा : अल्पवयीन मुलीचा (minor girl) तिच्या घरात जाऊन विनयभंग (molestation) करणा-या आरोपीला तीन सश्रम कारावासाची (Three rigorous imprisonment) शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हा निकाल वर्धा (Wardha) येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी (District Judge-1 V. T. Suryavanshi) यांनी दिला.
आरोपी विनोद भानुदास गेडाम (रा. मदनी, ता.आर्वी जि.वर्धा) यास कलम आठ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Child Sexual Abuse Act) शिक्षा ठोठावली. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, २८ जुलै २०१७ रोजी पीडिताचे आई-वडील कामावर गेले होते. पीडिताचे पोट दुखत असल्याने ती शाळेत गेली नव्हती. पीडिताची आजी ही खालच्या मजल्यावर होती व पीडिता ही तिच्या घरच्या वरच्या मजल्यावर एकटीच अभ्यास करत होती.
आरोपी हा पीडितेच्या वडीलांचा मित्र आहे. तेव्हा आरोपी वरच्या मजल्यावर आला व खोलीमधील सोफ्यावर बसला. आरोपीने पीडितेला पिण्याकरीता पाणी मागितले. पीडिताने आरोपीला पाणी दिल्यावर तिला सोफ्यावर बसायला सांगितले. तेव्हा पीडिता ही सोफ्यावर न बसता तिथेच उभी राहिली. नंतर आरोपीने पीडितेचा सेल्फी काढली. पीडिताला म्हणाला की, सेल्फी फोटो माझ्यासोबत घेऊन जाऊ का ? व नंतर म्हणाला की, मी तुला घेऊन जाऊ का ? त्यावर पीडिताने नाही म्हटले. त्यानंतर आरोपीने समोरील दार बंद केले. त्यामुळे पीडिताने तिच्या आजीला आवाज देण्याकरीता बाथरूमकडे गेली व आवाज दिला. परंतु, आजी खालच्या मजल्यावर असल्यामुळे आवाज ऐकू आला नाही.
त्यानंतर आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिचा हात ओढत तिला किचनकडे ओढत नेले. तोंड दाबल्यामुळे पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिने आरोपीच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे आरोपी हा तेथून पळून गेला. त्यानंतर पीडिता ही आरोपी पुन्हा येईल, या धाकाने खोलीचा दरवाजा लावून आत बसून राहिली. पीडितेच्या आजीने पाहिल्यामुळे ती वरच्या मजल्यावर आली. सर्व घटना आजीला सांगितली. त्यानंतर पीडितेने तिचे आई ड्युटीवरून परत आल्यावर तिला घटना सांगितली. त्यानंतर तिच्या आईसोबत येऊन सदर घटनेचा तोंडी रिपोर्ट रामनगर पोलिसांत दिला.
सदर प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक सचिन यादव रामनगर यांनी केला. तपासा दरम्यान, आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले व यशस्वी युक्तीवाद केला. त्यांना सदर प्रकरणात शंकर कापसे यांनी साक्षदाराना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे एकूण पाच साक्षदार तपासले. पीडिता तिची आई व इतर साक्षदार यांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-1 व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.