Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट वेबसाइट्स,ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा : परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 10, 2025 | 09:42 PM
Beware of fake websites, apps and fake e-challan links: Transport Department appeals to citizens

Beware of fake websites, apps and fake e-challan links: Transport Department appeals to citizens

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

हेही वाचा : संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत

परिवहन विभागाने सांगितले आहे की, फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे “चलन बाकी आहे”, “परवाना सस्पेंड होणार आहे” अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले की, आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही.

तसेच “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan Pay.apk” अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी VAHAN – (वाहन नोंदणी) https://vahan.parivahan.gov.in, SARATHI (ड्रायव्हिंग लायसन्स सेवा) https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा पोर्टल

https://www.parivahan.gov.in तसेच ई-चालान पोर्टल

https://echallan.parivahan.gov.in या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये.

हेही वाचा : ICC Test Ranking : भारताच्या ‘यॉर्कर किंग’ बुमराहचे साम्राज्य धोक्यात! मिचेल स्टार्कने मोठी झेप घेत पटकावले सर्वोत्तम स्थान

कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टल चे https://www.cybercrime.gov.in, सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.

अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये

नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुणे–सातारा महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ दोन भरारी पथके तैनात केली आहेत. शनिवारपासून (ता. २२) जडवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची २४ तास शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये डोळ्यांची तपासणी, मद्यप्राशन तपासणी तसेच वाहनांची तांत्रिक तपासणी समाविष्ट आहे. नुकतीच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नवले पूल परिसराची पाहणी करून तपासणीसाठी ठेवलेल्या जागेचा आढावा घेतला. खेड शिवापूर टोलनाक्यावरील ‘वे ब्रिज’जवळ वाहनांना थांबवून तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Transport department appeals to beware of fake websites apps and fake e challan links

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 09:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.