मिचेल स्टार्क आणि जसप्रीत बुमराह (फोटो-सोशल मीडिया)
ICC Test Ranking : आयसीसीने नुकतीच कसोटी गोलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये अॅशेस मालिकेतील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत चांगलीच झेप घेतली आहे. पर्थ आणि ब्रिस्बेन कसोटीत सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या स्टार्कने तीन स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसरे स्थान पटकावले आहे.त्याच्या प्रभावी झेपमुळे तो आता भारताच्या जसप्रीत बुमराहच्या पहिल्या क्रमांकाच्या अगदी जवळ येऊन पोहचला आहे.
हेही वाचा : संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत
जसप्रीत बुमराहची क्रमवारी
नोव्हेंबर २०२४ पासून भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत सातत्याने आपले अव्वल स्थान टिकवून आहे. त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पर्थ कसोटीत शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्याने पाच विकेट घेण्याचा समावेश होता. त्या सामन्यात भारताच्या विजयानंतर बुमराहने आपले पहिले स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. सध्या त्याचे ८७९ रेटिंग गुण असून तो पहिल्या स्थानी विराजमान आहे.
स्टार्क बुमराहच्या पहिल्यास्थानकडे जात आहे..
ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत, मिचेल स्टार्कचे ८५२ रेटिंग गुण प्राप्त केले आहेत, तो जसप्रीत बुमराहपेक्षा फक्त २७ गुणांनी पिछाडीवर आहे. अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या अॅशेस मालिकेत तीन कसोटी सामने खेळायचे शिल्लक असताना, स्टार्ककडे बुमराहला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनण्याची नामी संधी असणार आहे.
मिशेल स्टार्कने अॅशेसची सुरुवात दमदायर केली आहे. पर्थ कसोटीत त्याने १० बळी टिपले होते आणि ऑस्ट्रेलियाच्या आठ विकेटने विजयात महत्त्वाची भूमिका वठवली होती. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून त्याची निवड केली होती. ब्रिस्बेनमधील गाब्बा येथे झालेल्या डे-नाईट कसोटीमध्ये देखील स्टार्कची प्रभावी कामगिरी कायम राहिली आहे, जिथे त्याने पहिल्या डावात सहा बळींसह गुलाबी चेंडूने आठ बळी घेण्याची किमया साधली होती.
हेही वाचा : लग्न मोडल्यानंतर Smriti Mandhana पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…; दिल्ली विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल
ब्रिस्बेन कसोटीतील स्टार्कने आपली दमदार कामगिरी कामगिरी केली. त्यामुळे त्याला ३२ अतिरिक्त रेटिंग पॉइंट्स देखील मिळाले. त्याच सामन्यादरम्यान, तो वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील बनला. १०२ कसोटी सामन्यांमध्ये, मिशेल स्टार्कने ४२० विकेट घेण्याची किमया साधली आहे. ज्यामध्ये १८ पाच विकेट आणि तीन दहा विकेट घेतल्या आहेत. चालू अॅशेस मालिकेत दोन कसोटी सामन्यांमध्ये ४.०१ च्या इकॉनॉमी रेटने १८ विकेट घेऊन, त्याने हे दाखवून दिले आहे की, जर हाच फॉर्म कायम राहिला तर बुमराहचे अव्वल रँकिंग निश्चितच धोक्यात आणू शकतो.






