Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambadas Danve News: लाडक्या बहिणींच्या हफ्त्यांसाठी आदिवासी विभागाचे अनुदान पळवले…;अंबादास दानवेंचा आरोप

राज्यभरातील 'लाडक्या बहिणी' एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असताना, काही लाभार्थी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 03, 2025 | 02:25 PM
Ambadas Danve News: लाडक्या बहिणींच्या हफ्त्यांसाठी आदिवासी विभागाचे अनुदान पळवले…;अंबादास दानवेंचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अखेर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. अनेक दिवसांपासून या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. सरकारने पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये इतकी रक्कम जमा केली असून, ही रक्कम आजपासून उपलब्ध होत आहे. पण या हफ्त्यावरून  शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

अंबादास दानवे यांनी या महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यांसाठी आदिवासी विकास खात्याचे पैसे वळवल्याचा आरोप केला आहे.  अंबादास दानवे यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट करत लिहीलं आहे की, “लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले! सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले! अश्या प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले! नियम: नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही. ”

अभिजात मराठी राजभाषा गौरव गीताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले! सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70… — Ambadas Danve (@iambadasdanve) May 3, 2025

 

राज्यातील महिलांच्या खात्यात ‘लाडकी बहिणीं’योजनेच्या 1500 रुपयांची आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण, दुसरीकडे महायुती सरकारसमोर या योजनेसाठी आवश्यक निधी उभारण्याचे मोठे आव्हानही उभे राहिले आहे. राज्यातील दोन कोटी महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला विविध खात्यांच्या निधीमध्ये तडजोड करावी लागत असल्याचे यापूर्वी समोर आले होते. यात आता आणखी भर पडणार आहे. एप्रिल महिन्याचा हफ्त्यासाठी महिला गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होत्या. आजपासून एप्रिल महिन्याचा हफ्ता देण्यास सुरूवातही झाली.

पण या योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांचा एकूण 746 कोटी रुपयांहून अधिक निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी आणि आदिवासी विकास विभागाचा 335.70 कोटी रुपयांचा समावेश आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित खात्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी निधी वळवण्याबाबत नाराजी व्यक्त करत सरकारसमोर नाराजीचा सूर लावला आहे.

पाक क्रिकेट खेळाडूने पाकिस्तानी आर्मीवर साधला निशाणा! म्हणाला – सैन्याने चालवलेले घाणेरडे

 

Web Title: Tribal department grant diverted for installments of ladki bahin yojna ambadas danve alleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojna

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 
1

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.