फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
बाबर आझमची इंस्टाग्राम पोस्ट : भारतामध्ये सरकार त्याचबरोबर देशामधील नागरिक हे पहलगाम हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात या घटनेचा दोषी हे पाकिस्तान आर्मी आहे असे म्हटले आहे. या घटनेनंतर आता भारतीय सरकारने तीव्र प्रत्त्युत्तर देण्याचे ठरवले आहे. आधी इन्स्टाग्रावरून पाकिस्तानी अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. त्याचबरोबर काल पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंचे अकाऊंट देखील सोशल मीडियावरून बॅन करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांसारख्या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.
आता पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामुळे तो सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याने भारतामध्ये बॅन झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचा संताप व्यक्त केला आहे. त्याने पाकिस्तानी आर्मीवर निशाणा साधला आहे एवढेच नव्हे तर त्याने हे कृत्य कोण करत आहे याचा देखील खुलासा केला आहे.
बाबर आझम याने भारतामध्ये बॅन झाल्यानंतर एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने स्पष्टपणे पाकिस्तान आर्मीवर निशाणा साधला आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत बाबर आझम म्हणाला की, एक क्रिकेट खेळाडू म्हणून मला नेहमीच भारतामध्ये खेळायला आवडते एवढेच नाही तर मी नेहमीच ते माझे दुसरे घर आहे असे समजतो. पुढे तो म्हणाला की, दुर्देवाने माझे इंस्टाग्राम अकाउंट भारतामध्ये बॅन करण्यात आले आहे, मी हे पूर्णपणे स्पष्ट करू इच्छितो – पहलगाम हल्ल्यात क्रिकेटपटूंचा सहभाग नाही.
पुढे त्याने लिहिले आहे की, जे काही पाकिस्तानी जनतेसोबत घडत आहे ते पाकिस्तानी सैन्याने चालवलेले घाणेरडे राजकारण आहे त्याचे हे सगळे परिणाम आहेत. एवढेच नाही तर तो असेही म्हणाला की, मी नावे घेणार नाही परंतु पाकिस्तानमध्ये कोणाची सत्ता आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि कोण दहशतवाद्यांचे संरक्षण करत आहे आणि त्यांचे पालनपोषण करत आहे.पाकिस्तान सैन्याला – तुमच्या कृतींमुळे निष्पाप पाकिस्तानी नागरिकांना त्रास होत आहे. दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करा असे त्याने स्पष्ट केले आहे. या त्याच्या स्टोरी नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
#BabarAzam #PMModi #IndiaPakistanTenison South Asia #IndiaPakistanWar #SRHvGT
Babar Azam just did what no journalist in #Pakistan dares to he exposed Pakistan and its Army.
A single Instagram story revealed the frustration of a country muzzled by its own military and drowning… pic.twitter.com/NjgK64l50i
— Ramesh (@Iam_Rameshh_) May 2, 2025